मराठी बातम्या /बातम्या /मनी /

1 फेब्रुवारीपासून होणार हे 5 मोठे बदल, तुमच्या आयुष्यावर करणार थेट परिणाम

1 फेब्रुवारीपासून होणार हे 5 मोठे बदल, तुमच्या आयुष्यावर करणार थेट परिणाम

1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. यामुळे सामान्यांच्या आयुष्यात काही बदलाव होणारच आहेत पण त्या व्यतिरिक्तही काही बदल 1 तारखेपासून होणार आहेत.

1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. यामुळे सामान्यांच्या आयुष्यात काही बदलाव होणारच आहेत पण त्या व्यतिरिक्तही काही बदल 1 तारखेपासून होणार आहेत.

1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. यामुळे सामान्यांच्या आयुष्यात काही बदलाव होणारच आहेत पण त्या व्यतिरिक्तही काही बदल 1 तारखेपासून होणार आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 27 जानेवारी: 1 फेब्रुवारीपासून काही महत्त्वाचे बदल सामान्यांच्या आयुष्यात होणार आहेत. यामधील सर्वात महत्त्वाची बाबत म्हणजे यादिवशी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान यावेळी काही घोषणा करण्यात येतील, ज्यांचा परिणाम थेट सामान्यांच्या आयुष्यावर होणार आहे. या व्यतिरिक्त देखील काही नियमात फेब्रुवारी महिन्यात काही बदल होणार आहेत, जे सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करतील. जाणून घ्या काय आहेत हे बदल 1. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून बदलणार एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये (LPG Gas Cylinder Price) बदलाव करण्यात येतो. जानेवारी महिन्यात या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. असे असले तरीही डिसेंबर महिन्यात LPG चे दर 2 वेळा बदलले होते. तेल कंपन्यांकडून घरगुती आणि कमर्शिअल एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल केला जातो 2. या एटीएममधून काढता येणार नाहीत पैसे 1 फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम एटीएम मशीन्समधून (Non-EMV ATM) ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीत. अर्थात या नॉन-ईएमव्ही मशीन्समधून कॅश काढू शकत नाहीत. PNB ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर असे म्हटले आहे की, 'फसवणुकीपासून वाचण्यासाठी ग्राहकांना पीएनबी नॉन ईएमव्ही एटीएम मशीन्समधून 01.02.2021 पासून व्यवहार (वित्तिय किंवा गैर-वित्तिय) करण्यापासून प्रतिबंधत केलं जाईल. गो डिजिटल.. गो सेफ!' (हे वाचा-Budget 2021: सरकार अनेक गोष्टींवर कस्टम ड्यूटी हटवण्याची शक्यता, वाचा सविस्तर) 3. सुरू होणार या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स Air India Express ने नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची घोषणा केली आहे. Air India Express फेब्रुवारी ते 27 मार्च दरम्यान त्रिची आणि सिंगापूर दरम्यान रोज फ्लाइट सुरू करणार आहे. या रुटमध्ये आणखी देखील काही कनेक्शन असणार आहेत, जसे की, कुवैतहून विजयवाडा, हैदराबाद, मंगळुरू, त्रिची, कोझिकोड, कुन्नूर आण कोची. Air India Express ने याआधीही काही फ्लाइट्सची घोषणा केली आहे, ज्या जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. 4. स्वस्त होतील हे प्रोडक्ट्स पुढील आठवड्यात सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2021) सरकार विविध वस्तूंवरील सीमा शुल्क (Custom Duty) हटवण्याची शक्यता अधिक आहे. सामान्यांना याचा फायदाच होणार आहे. यामध्ये फर्निचरसाठी लागणारा कच्चा माल, तांबे भंगार, काही रसायनं, दूरसंचार उपकरणं आणि रबराची उत्पादनं यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पॉलिश केलेले हिरे, रबराचे सामान, चामड्याचे कपडे, दूरसंचार उपकरणं आणि गालिचे यासारख्या एकूण 20 हून अधिक प्रोडक्ट्सवरील आयात शुल्कांमध्ये कपात केली जाऊ शकते. याशिवाय फर्निचर बनवण्यात वापरण्यात येणारे न रंगवलेली लाकडं आणि हार्डबोर्ड यावरील सीमा शुल्क पूर्णपणे संपुष्टात आणले जाऊ शकते. (हे वाचा-EMI ने भरत आहात क्रेडिट कार्डचं बील, लक्षात ठेवा हे महत्त्वाचे मुद्दे अन्यथा...) 5. PMC बँकेसाठी ऑफर देण्याची डेडलाइन पीएमसी बँक अॅडमिनिस्ट्रेशनने बँकेची पुन्हा एकदा उभारणी करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून ऑफर घेण्यासाठीची डेडलाइन 1 फेब्रुवारी निश्चित केली आहे. काही गुंतवणूकदार जसं की, Centrum Group-BharatPe ने एकत्र येत ऑफर दिली आहे. यूकेतील कंपनी Liberty Group ने देखील ऑफर दिली आहे.

First published:

Tags: Budget 2021, Money, Nirmala Sitharaman

पुढील बातम्या