ppf
मुंबई, 27 जानेवारी: पब्लिक प्रोव्हिडेंट फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यामध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. पीपीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी दावा कसा करू शकतो? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. खातेधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनी बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला फॉर्म सबमिट करून रकमेवर दावा करू शकतो. 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणत्याही उत्तराधिकार प्रमाणपत्राशिवाय दावा केला जाऊ शकतो. आता क्रेडिट कार्डने भरु शकता घरभाडे, जाणून घ्या PhonePe च्या माध्यमातून रेंट पेमेंटची प्रोसेस
पीपीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीकडून पैशावर दावा केला जाऊ शकतो. क्रेडिट ट्रान्सफर होण्यापूर्वी खातेदाराद्वारे परतफेड केलेल्या कर्जाची रक्कम कापली जाईल. क्लेमसाठी जी फॉर्म भरावा लागेल.
फॉर्म G हा बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो. या फॉर्ममध्ये खाते क्रमांक, नॉमिनीचे डिटेल्स, मोबाइल नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल. आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस
तीन स्थितींमध्ये खातेधारकाच्या मृत्यूवर क्लेम जनरेट होतो. क्लेम करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ती कोणती ते आपण जाणून घेऊया…
-नॉमिनीद्वारे भरण्यात आलेला फॉर्म -डेथ सर्टिफिकेट -खातेदाराचे पासबुक
-कायदेशीर वारसाने भरलेला फॉर्म -मृत्यु प्रमाणपत्र -उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा मृत्युपत्राची अटेस्टेड कॉपी -ग्राहकाचे पासबुक
-पीपीएफ खात्यात पैशांचा क्लेम करेपर्यंत जमा पैशांवर व्याज मिळते. -ग्राहकांच्या मृत्यूनंतर पीपीएफ अकाउंट सुरु राहत नाही. -ग्राहकाच्या मृत्यूनंतर PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत नाही. -सक्सेशन सर्टिफिकेटशिवाय 1 लाखांपर्यंतच्या रक्कमेसाठी दावा केला जाऊ शकतो.