JOIN US
मराठी बातम्या / मनी / अपघात प्रसंगी मोदी सरकारची ही योजना ठरेल फायद्याची, जाणून घ्या कसा करता येईल क्लेम

अपघात प्रसंगी मोदी सरकारची ही योजना ठरेल फायद्याची, जाणून घ्या कसा करता येईल क्लेम

पंतप्रधान विमा सुरक्षा योजना (PM Bima Suraksha Yojana) अंतर्गत इन्शूरन्स काढणाऱ्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास नॉमिनीला किंवा त्याच्या कुटुंबाला 2 लाखाची रक्कम दिली जाते. त्याचबरोबर अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख आणि पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये विमाधारकाला देण्यात येतात

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 डिसेंबर: केंद्र सरकारने 2015 मध्ये सामान्य नागरिकांसाठी अपघात विम्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आहे. या योजनेमध्ये केवळ 12  रुपये वार्षिक प्रीमियम देऊन ग्राहकांना 2 लाखांपर्यंतचा विमा कव्हर दिला जातो. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. पंतप्रधान विमा सुरक्षा योजना  (PM Bima Suraksha Yojana) अंतर्गत इन्शूरन्स काढणाऱ्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास नॉमिनीला किंवा त्याच्या कुटुंबाला 2 लाखाची रक्कम दिली जाते. त्याचबरोबर अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख आणि पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये विमाधारकाला देण्यात येतात. कसं करता येईल क्लेम? पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेमध्ये क्लेम करण्याासाठी नॉमिनीला त्या बँकेत किंवा इन्शूरन्स कंपनीमध्ये जावे लागेल, जिथे विमाधारकाने पॉलिसी खरेदी केली आहे. याठिकाणी नॉमिनीला विम्याची रक्कम क्लेम करण्यासाठी एक फॉर्म दिला जातो. ज्यामध्ये नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, हॉस्पिटलची माहिती इ. सविस्तर माहिती द्यावी लागते. याशिवाय नॉमिनी हा फॉर्म jansuraksha.gov.in  या वेबसाइटवरू देखी डाऊनलोड करू शकतात. या वेबसाइटवर हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त अनेक स्थानिक भाषांमध्ये देखील हा फॉर्म उपलब्ध आहे. (हे वाचा- SBI विकत आहे स्वस्त प्रॉपर्टी! 30 डिसेंबरला होणार लिलाव, वाचा सविस्तर माहिती ) क्लेमसाठी आवश्यक कागदपत्र जेव्हा नॉमिनीकडून पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेच्या रकमेसाठी क्लेम केला जातो, तेव्हा त्याला फॉर्मबरोबर काही आवश्यक दस्तावेज देखील जमा करावे लागतात. यामध्ये प्रामुख्याने डेथ सर्टिफिकेट आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेटचा देखील समावेश आहे. (हे वाचा- कर्मचाऱ्यांना दिलासा! कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही बदलला जाणार तुमचा Permanent Job ) व्हेरिफिकेशन नंतर मिळते पॉलिसीची रक्कम पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी क्लेम केल्यानंतर जेव्हा नॉमिनी फॉर्म बरोबर सर्व दस्तावेज जमा करतो, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून त्या दस्तावेजांचे व्हेरिफिकेशन केलं जातं. यामध्ये नॉमिनीने दिलेली माहिती योग्य असेल, तर तर नॉमनीने दिलेल्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाती. अशाप्रकारे हे क्लेम सेटलमेंटचं काम पूर्ण केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या