नवी दिल्ली, 08 मे: जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office) स्मॉल सेव्हिंग स्कीम (Small saving schemes)मध्ये गुंतवणूक करत असाल तर वेगवेगळ्या सुविधांसाठी तुम्हाला वेगवेगळे शुल्क द्यावे लागेल. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये केली जाणारी गुंतवणूक नेहमीच एक चांगला पर्याय मानण्यात आला आहे. या योजनांमध्ये चांगला परतावा (Good Return) मिळण्याबरोबरच तुमचे पैसे सुरक्षित असल्याची हमी असते. तुम्ही देखील अशा छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर हे माहित असणं आवश्यक आहे की कोणत्या सेवेसाठी किती शुल्क आकारण्यात येते आहे. हे शुल्क नवीन चेकबुक, अकाउंट ट्रान्सफर करण्याचं काम, अकाउंट स्टेटमेंट काढणं यासंदर्भातील आहे. जाणून घ्या तुम्हाला किती शुल्क द्यावे लागेल. पोस्ट ऑफिस बचत योजना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीसाठी 9 छोट्या बचत योजना उपलब्ध आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट, नॅशनल सेव्हिंग्स रिकरिंग डिपॉझिट अकाउंट (RD), नॅशनल सेव्हिंग्स टाइम डिपॉझिट अकाउंट, नॅशनल इनकम मंथली इन्कम अकाउंट (MIS), सीनियर सिटीझन सेव्हिंग्स स्कीम (SCSS), पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC), किसान विकास पत्र (KVP), सुकन्या समृद्धि योजना (SSY) या योजनांचा समावेश आहे. हे वाचा- सोन्याच्या खरेदी-विक्रीबाबतचा हा नियम बदलणार, तुमच्या दागिन्यांवर होणार परिणाम? या सेवांवर आकारलं जातं शुल्क -डुप्लिकेट पासबुक जारी करण्यासाठी 50 रुपये फी आहे -अकाउंट स्टेटमेंट आणि डिपॉझिट पावती जारी करण्यासाठी प्रत्येक वेळी 20 रुपये आकारले जातात. -सर्टिफेकेट हरवल्यास किंवा खराब झाल्यास पासबुक जारी करण्यासाठी 10 रुपये नोंदणी शुल्क आहे -नॉमिनेशन रद्द किंवा बदलण्यासाठी 50 रुपये द्यावे लागतील -अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागेल हे वाचा- जनधन खात्यात पैसे मिळाले की नाही? या नंबरवर मिस्ड कॉल देऊन घरबसल्या घ्या जाणून -अकाउंटच्या प्लेजिंगसाठी लिए 100 रुपये शुल्क द्यावे लागेल -सेव्हिंग बँक खात्यामध्ये चेक बुक जारी करण्यासाठी एका कॅलेंडर इयरमध्ये 10 चेकपर्यंत कोणतेही शुल्क नाही आहे, त्यानंतर प्रति चेक 2 रुपये द्यावे लागतील. -चेक बाउंस हो झाल्यास 100 रुपये शुल्क द्यावे लागेल