JOIN US
मराठी बातम्या / मनी / आजपासून सोन्याच्या दागिन्यांसंदर्भातील हा महत्त्वाचा नियम बदलला, उल्लंघन केल्यास होईल जेल

आजपासून सोन्याच्या दागिन्यांसंदर्भातील हा महत्त्वाचा नियम बदलला, उल्लंघन केल्यास होईल जेल

15 जूनपासून गोल्ड हॉलमार्किंग (GOLD Hallmarking) अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर या संबंधातील नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जून: 15 जूनपासून गोल्ड हॉलमार्किंग (GOLD Hallmarking) अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर या संबंधातील नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की, 15 जूनपासून देशात केवळ बीआयएस हॉलमार्किंग (BIS hallmarking) असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री होईल. आजपासून अशाप्रकारचे दागिने विकणं ज्वेलर्ससाठी अनिवार्य असेल. गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्याबाबत सरकार गेली दीड वर्ष योजना आखत आहे आणि आजपासून हा आदेश संपूर्ण देशात लागू होणार आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती (Coronavirus in India) लक्षात घेता सरकारने हॉलमार्किंग अनिवार्यता लागू करण्याची तारीख पुढे ढकलली होती. मात्र आता  देशात केवळ हॉलमार्किंग असणारीच ज्वेलरी विकली जाईल. सोन्याच्या शुद्धतेबाबत होणारी फसवणूक कमी करण्यासाठी हा निर्णय फायद्याचा ठरेल, असं जाणकारांचं मत आहे. जाणून घ्या सविस्तर गोल्ड हॉलमार्किंग काय आहे? केंद्र सरकारने अशी माहिती दिली आहे की, गोल्ड हॉलमार्किंग देशातील सर्व सोने व्यापाऱ्यांना त्यांच्यकडील दागिने किंवा इतर कलाकृती विकताना लागू होईल. त्यांना बीआयएस स्टँडर्डचे मानक पूर्ण करणं आवश्यक असेल, तसं न केल्यास कठोर कारवाई देखील होऊ शकते. हे वाचा- दोन दिवसानंतर 50 रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्य तेल; हे आहे कारण होऊ शकते जेल सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय बीआयएस कायदा, 2016 च्या सेक्शन 29 अंतर्गत 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. तपासणीसाठी सरकारने BIS-Care असं App देखील लाँच केलं आहे. यामध्ये शुद्धता तपासण्याबरोबरच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. याठिकाणी तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येतील. किती कॅरेट सोन्याचं होईल हॉलमार्किंग? हा नियम लागू झाल्यामुळे  14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे हॉलमार्किंग होईल. हे वाचा- सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ, महागाईच्या दराने गाठला 6 महिन्यांतला उच्चांक घरातील सोन्याचं काय होणार? सोनेविक्रीबाबतचा हा महत्त्वाचा नियम बदलल्यानंतर असा प्रश्न उपस्थित राहतो तो तुमच्याकडे घरी असलेल्याच सोन्याचं किंवा सोन्याच्या दागिन्यांचं काय होईल? दरम्यान हॉलमार्किंगचा हा नियम सोने विक्री करणाऱ्या ज्वेलर्ससाठी लागू करण्यात आला आहे. ग्राहक त्यांच्याकडील दागिने हॉलमार्कशिवाय विकू शकतात. या नियमामुळे काय फायदा होईल? सरकारने या नियमात बदल केल्यामुळे शुद्धतेचे प्रमाण सहज करता येईल. यामुळे हँडक्राफ्ट गोल्ड मार्केटला देखील प्रोत्साहन मिळेल. शिवाय ज्वेलरी इंडस्ट्रीटा विस्तार होण्यासही मदत होईल. सध्या देशभरात 234 जिल्हांमध्ये 892 हॉलमार्किंग केंद्र संचालित आहेत, जे  28,849 बीआयएस रजिस्‍टर्ड ज्‍वेलर्ससाठी हॉलमार्किंग करतात. आता या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या