नवी दिल्ली, 04 जुलै: तुम्हाला देखील सुरक्षित गुंतवणूक (Top Investment Plan) करायची असेल तर पोस्ट ऑफिसकडून काही छोट्या बचत योजना दिल्या जातात. या योजनांमध्ये जोखीम कमी असल्याने अनेक गुंतवणूकदारांचा कल या योजनांकडे असतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला रिटर्न देखील मिळेल. या योजनांमध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. केंद्र सरकारने सर्व छोट्या बचत योजनांसाठी (Small Savings Schemes) असणाऱ्या व्याजदरात याही तिमाहीमध्ये कोणते बदल केलेले नाहीत. अशावेळी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या काही महत्त्वाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करू शकता. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही योजना खास मुलींसाठी राबवण्यात येत असून यामध्ये 7.6 टक्के दराने व्याज मिळते. याठिकाणी तुम्ही गुंतवलेली रक्कम साधारण 9 वर्षात दुप्पट होईल. सीनिअर सीटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) SCSS या योजनेमध्ये तुम्हाला 7.4 टक्के दराने व्याज मिळेल, याठिकाणी 9.73 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील पीपीएफ योजना (Public Provident Fund PPF) पोस्टाच्या पीपीएफ योजनेमध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये तुमचे पैसे साधारण 10 वर्षात दुप्पट होतील हे वाचा- खूशखबर! जनधन खातेधारकांना मिळेल 1.3 लाख रुपयांचा फायदा, वाचा सविस्तर मंथली इन्कम स्कीम (MIS) MIS मध्ये गुंतवणूक केल्यानंतर 6.6 टक्के दराने व्याज मिळतं. यामध्ये तुमचे पैसे साधारण 10 वर्षात दुप्पट होतील नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम (NSC) NSC मध्ये तुम्हाला 6.8 टक्के दराने व्याज मिळेल. ही 5 वर्षीय बचत योजना आहे. यामध्ये 10 वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतील टाइम डिपॉझिट योजना (TD) 1 ते 3 वर्षापर्यंत टाइम डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने 5.5 टक्क्यांचं व्याज मिळतं. या योजनेत 13 वर्षांनी पैसे दुप्पट होतीत. तुम्ही 5 वर्षासाठी टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज मिळेल. हे वाचा- 62 लाख पेन्शनर्ससाठी Good News! पेन्शन रकमेसंदर्भात सरकारने घेतला हा निर्णय रेकरिंग डिपॉझिट स्कीम (RD) आरडीमध्ये तुम्हाला 5.8 टक्के दराने व्याज मिळेल. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर जवळपास 12 वर्षांनी तुमचे पैसे दुप्पट होतील सेव्हिंग अकाउंट पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये 4 टक्के दराने व्याज मिळते. याठिकाणी ठेव ठेवल्यानंतर तुमचे पैसे 18 वर्षांनी डबल होतील.