नवी दिल्ली, 31 मे : भारतीय रेल्वे (Indian Railway)ने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून 200 रेल्वे गाड्या पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. याकरता IRCTCची वेबसाइट आणि App वर रेल्वेने 21 मे पासून तिकिट बुकिंग देखील सुरू केली आहे. याआधीपासून धावणाऱ्या श्रमिक रेल्वे आणि 30 स्पेशल एसी गाड्यांव्यतिक्त 200 गाड्या 1 जूनपासून धावणार आहेत. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत आणि यामध्ये एसी व नॉन एसी असे दोन्ही क्लास असणार आहेत. जनरल कोचमध्ये बसण्याकरता देखील आरक्षण करणे आवश्यक असणार आहे. कोणताही अनारक्षित कोच या गाड्यांमध्ये असणार नाही. लॉकडाऊन काळात तब्बल दोन महिन्यांनी मेल आणि एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने काही गाइडलाइन देखील जारी केल्या आहेत. (हे वाचा- UNLOCK 1.0 : सरकारकडून नवीन गाइडलाइन जारी, वाचा कधी सुरू होणार चित्रपटगृहं) - या रेल्वे गाड्यांमध्ये तिकिट तपासणारा रेल्वेचा स्टाफ देखील पीपीई किट, ग्लोव्ह्ज आणि मास्क घालून असेल. तिकिट तपासण्यासाठी त्यांच्याकडे मॅग्निफायिंग ग्लास असणार आहे - सर्व 230 रेल्वे गाड्यांसाठी आगाऊ बुकिंगचा कालावधी 30 दिवसांवरून 120 दिवस केला आहे - तात्काळ बुकिंग आधीप्रमाणेच सामान्य करण्यात आले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकावर ते आधारित असेल. - कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता रेल्वेने असे आवाहन केले आहे की गरोदर महिला, 10 वर्षांखालील लहान मुलं आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक यांनी रेल्वे प्रवास करू नये. अति अत्यावश्यक परिस्थितीमध्येच त्यांना प्रवास करता येईल (हे वाचा- SBI अलर्ट! हे मोबाइल Apps ठरू शकतात तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी घातक ) - रेल्वेने आरक्षण काऊंटरवर तिकिटांचे बुकिंग आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोस्ट ऑफिस, आयआरसीटीसी यांसारख्या अन्य पर्यायांचा वापर करून देखील तिकिट बुक करता येणार आहे. रेल्वेने प्रवास करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी - सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना हँड सॅनिटायझर देण्यात येईल - कन्फर्म आणि वैध तिकिट असणाऱ्यांना प्रवास करता येईल - सर्व प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक आहे - सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग होईल. ज्यांच्यामध्ये कोव्हिडचे लक्षण नाही आहे, त्यांनाच प्रवास करता येईल (हे वाचा- या कंपनीमध्ये पत्रकारांची जागा घेणार ‘रोबो’, सुमारे 50 जणांची नोकरी धोक्यात ) - सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे - तुमच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू App असणे अनिवार्य आहे संकलन, संपादन - जान्हवी भाटकर