Representative Image
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: कोरोना काळात (Coronavirus in India) देशभरात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Coronavirus Lockdown in India) प्रवासी गाड्या बंद होत्या. दरम्यान या काळात मध्ये रेल्वेने रेल्वे परिसरातील भंगार साहित्यातून कोट्यवधींची कमाई केली आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये मध्य रेल्वेने वेगवेगळ्या परिसरातील भंगार साहित्य विकून 391 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. मध्य रेल्वेने केली मोठी कमाई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान विविध रेल्वे परिसरातील स्क्रॅप विकून मध्य रेल्वेने केवळ 391 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे असं नाही तर यामुळे रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यात खूप मदत झाली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या अनेक विभागांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे वाचा- सामान्यांना मोठा झटका, पुन्हा महागला घरगुती गॅस सिलेंडर;मोजावी लागणार एवढी किंमत मध्य रेल्वेने सुरू केलंय झिरो स्क्रॅप मिशन दरम्यान मध्य रेल्वेने झिरो स्क्रॅप मिशन (Zero Scrap Mission) सुरू केलं आहे. ज्याअंतर्गत हे सुनिश्चित केलं आहे की, मध्य रेल्वेतील प्रत्येक मंडळ, कारखाना आणि शेड ही स्क्रॅप सामग्री मुक्त असेल. या स्क्रॅप सामग्रीमध्ये स्क्रॅप रेल्वे, पर्मनेंट साहित्य, खराब झालेले रेल्वेचे डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह इ. चा समावेश आहे. 8.65 कोटी रुपयांच्या उत्पन्नासह मध्य रेल्वेने ई-लिलावाद्वारे ज्याठिकाणी साहित्याची विल्हेवाट लावली आहे. हे साहित्य जसं आहे त्याच ठिकाणी सोडून देण्यात आलेलं होतं. हे वाचा- Gold-Silver Price Today: सोन्याचांदीला झळाळी, आज सोन्याचे दर 47 हजारांपार मिळालेल्या माहितीनुसार, 2020-21 मध्ये अशाप्रकारच्या स्क्रॅपच्या माध्यमातून रेल्वेजी कमाई केली आहे ती गेल्या 15 वर्षातील सर्वाधिक आहे. याचा एक फायदा झाला तो म्हणजे रेल्वे प्रवास बंद असल्यामुळे रेल्वेचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई होण्यास मदत झाली आहे. 2020-21 च्या रेकॉर्ड ब्रेकिंग कमाईनंतर मध्य रेल्वेने 2021-22 साठी 400 कोटींच्या स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.