JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI ग्राहकांसाठी खास भेट! केवळ 4 स्टेप्समधून मिळवा पर्सनल लोन, नाही द्यावी लागणार प्रोसेसिंग फी

SBI ग्राहकांसाठी खास भेट! केवळ 4 स्टेप्समधून मिळवा पर्सनल लोन, नाही द्यावी लागणार प्रोसेसिंग फी

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना अत्यंत कमी व्याजदरात पर्सनल लोन (Personal Loan On Low Interest Rates) ची ऑफर देऊ केली आहे. याशिवाय बँक ग्राहकांना कर्जावर झिरो प्रोसेसिंग फी (SBI Loan Zero Processing Fees) ची सुविधा देखील देत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना अत्यंत कमी व्याजदरात पर्सनल लोन (Personal Loan On Low Interest Rates) ची ऑफर देऊ केली आहे. याशिवाय बँक ग्राहकांना कर्जावर झिरो प्रोसेसिंग फी (SBI Loan Zero Processing Fees) ची सुविधा देखील देत आहे. तुम्ही एसबीआयच्या वैयक्तिक कर्जासाठी कधीही अप्लाय करू शकता. अगदी रात्री उशिरा देखील घरबसल्या या कर्जासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. योनो अॅपवर अवघ्या काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही कर्ज मिळवू शकता. दरम्यान सर्वांनाच हे लोन मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज (SBI Personal Loan) मिळवण्याच्या पात्रतेत बसणाऱ्यांनाच हे कर्ज मिळेल. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइट-sbi.co.in  ला भेट देऊ शकता. हे वाचा- बँकाच्या खासगीकरणासाठी बँकिंग कायद्यात सुधारणा करण्याचं विधेयक मांडणार सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदार असणाऱ्या या बँकेने  अलीकडेच या ऑफरबद्दल ट्वीट केले होते. बँकेने आपल्या ट्वीटमध्ये वैयक्तिक कर्जावर दिल्या जाणाऱ्या या ऑफरचे फायदे सांगितले आहेत. बँकेने म्हटले आहे की कमी व्याज दर, शून्य प्रक्रिया शुल्क या सुविधांसह आम्ही तुम्हाला योग्य निवडण्यात मदत करतो. SBI वैयक्तिक कर्जासाठी, ग्राहकांना 9.60 टक्के वार्षिक दराने व्याज द्यावे लागेल. 31 जानेवारी 2022 पूर्वी कर्ज घेतले असेल तरच झिरो प्रोसेसिंग फी लागू होईल. कशाप्रकारे मिळवाल लोन? हे लोन मिळवण्यासाठी तुमच्याकजे YONO app असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे योनो आणि तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहात तर केवळ चार स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही कर्ज मिळवू शकता. 1. सर्वात आधी तुम्हाला YONO App मध्ये लॉग इन करायचे आहे 2. यानंतर तुम्हाला ‘Avail Now’ वर क्लिक करायाचे आहे 3. याठिकाणी कालावधी (टेन्योर) आणि रक्कम (अमाउंट) प्रविष्ट करा 4. यानंतर तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा. ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर कर्जाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होईल हे वाचा- Latent View Analytics Share: गुंतवणूकदारांना लॉटरी, दोन दिवसात पैसे तिप्पट लोन मिळेल की नाही कसे तपासाल? जर तुम्हाला पाहायचे आहे की तुम्हाला लोन मिळेल की नाही तर तुम्ही 567676 या क्रमांकावर SMS करून माहिती मिळवू शकता. तुम्हाला एसएमएसमध्ये लिहून 567676 या क्रमांकावर पाठवायचे आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या