JOIN US
मराठी बातम्या / मनी / बँकेत वारंवार तक्रार करुनही काम होत नाही? थेट RBI करता येते तक्रार, जाणून घ्या प्रोसेस

बँकेत वारंवार तक्रार करुनही काम होत नाही? थेट RBI करता येते तक्रार, जाणून घ्या प्रोसेस

बँक ग्राहक कोणत्याही बँक किंवा NBFC बद्दल ऑनलाइन तक्रार सहजपणे करू शकतात. जाणून घेऊया त्याची प्रोसेस…

जाहिरात

बँकेची तक्रार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तुमची बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन (NBFC) तुमच्याकडून जास्त चार्ज आकारत असेल आणि  वारंवार तक्रारी करूनही त्याचे निराकरण करत नसेल, तर टोंट वरी. तुम्ही थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकता. ग्राहक RBI च्या कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टम (CMS) वर बँका आणि NBFC विरुद्ध तक्रारी नोंदवू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही तक्रार करु शकता. RBI ने अनेक वेळा बँक ग्राहकांना मॅसेज पाठवले आहेत की, RB-Integrated Ombudsman Scheme अंतर्गत ग्राहक https://images.rbi.org.in वर कोणत्याही बँक किंवा NBFC विरुद्ध तक्रारी दाखल करू शकतात. अधिक माहितीसाठी ग्राहक 14440 वर कॉल करू शकतात.

WhatsApp च्या माध्यमातून चेक करा बँक बॅलेन्स, पण कसं?

ऑनलाइन तक्रार कशी करावी?

-यासाठी ग्राहकांना प्रथम https://images.rbi.org.in वर जाऊन File a Complaint लिंकवर क्लिक करावे लागेल. -आता कॅप्चा कोड टाका. -नंतर नाव टाका आणि मोबाईल नंबर देखील अॅड करा. -यानंतर गेट ओटीपीवर क्लिक करुन ओटीपी टाका. -आता ड्रॉप डाऊनवरुन तक्रारीचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तक्रारीची कॅटेगिरी यांसारखी माहिती यामध्ये टाका. -यासोबतच तुम्हाला ज्या संस्थेची तक्रार करायची आहे त्याची सविस्तर माहिती येथ टाकावी लागेल. -संबंधित प्रश्नांच्या आधारे रेडिओ बटन निवडा आणि नेक्स्टवर क्लिक करा. -आता तुम्ही संबंधित संस्थेकडे लेखी तक्रार नोंदवली आहे की नाही याची पुष्टी करा. -तारीख एंटर करा आणि तुमच्या डिव्हाइसवरून फाइल अपलोड करा. -तक्रारीचे डिटेल्स जसे की रक्कम आणि व्यवहाराशी संबंधित इतर डिटेल्स यामध्ये अॅड करा. त्यासाठी योग्य रेडिओ बटण निवडा. -तुमच्या व्यवहाराचे समर्थन करण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही दस्तऐवज असल्यास, ते अपलोड करा. -Review and Submit वर क्लिक करा. -शेवटी तुम्ही PDF डाउनलोड करू शकता.

आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या