मुंबई, 19 जानेवारी: तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत प्रोव्हिडेंट पंड खाते वापरत असल्यास, तुम्ही ही बातमी एकदा वाचलीच पाहिजे. या बातमीत आम्ही तुम्हाला तुमच्या PF खात्यातील बॅलेन्स घरबसल्या कसे तपासता येईल याची सोपी पद्धत सांगणार आहोत. केंद्र सरकारच्या योजनेत ईपीएफचा समावेश आहे. या योजनेद्वारे नोकरदार लोकांची बचत वाढवता येऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये कोणत्याही संस्थेचे कर्मचारी आणि संस्थेच्या वतीने पैसे जमा केले जातात. यामध्ये कर्मचार्यांच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि 12 टक्के नियोक्त्याचे योगदान असते. त्यापैकी 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि 8.33 टक्के ईपीएसमध्ये जमा होते. या सर्वांचा तपशील जाणून घेण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात जावे लागेल. आज आम्ही तुम्हाला यामधील बॅलेन्स चेक करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. जगातील प्रत्येक व्यक्तीवर आहे 31 लाखांचे कर्ज, रिपोर्टमध्ये खुलासा
पीएफ खात्यात व्याज जमा झाल्यानंतर तुम्ही रक्कम पाहू शकता. त्या खात्यात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती तुम्ही सहज मिळवू शकता. पीएफ खात्यातील बॅलेन्स अनेक प्रकारे तपासली जाऊ शकते. यामध्ये तुम्ही पीएफ खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे तपासू शकता. Post Office च्या ‘या’ 5 योजनांमधून करता येईल बंपर कमाई, टॅक्समधूनही मिळेल सूट
- सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर जा आणि सर्व्हिस टॅबवर क्लिक करा. - आता ‘कर्मचारी’ विभागावर क्लिक करा. - त्यानंतर ‘मेम्बर पासबुक’ वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. - आता संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल.
-तुम्ही प्रथम एसएमएसद्वारे पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम तपासावी. -यासाठी EPFOHO UAN ENG लिहून 7738299899 वर एसएमएस पाठवावा लागेल. -SMS मध्ये लिहिलेले शेवटचे 3 अक्षर तुमची पसंतीची भाषा दर्शवतात. यामध्ये ENG म्हणजे इंग्रजी. इंग्रजी, हिंदी, तमिळ, मराठी, बंगाली, कन्नड, पंजाबी, तेलुगु, मल्याळम आणि गुजराती अशा एकूण 10 भाषांमधून तुम्ही निवडू शकता. -यामध्ये हिंदीसाठी HIN, पंजाबीसाठी PUN, गुजरातीसाठी GUJ, मराठीसाठी MAR, कन्नडसाठी KAN, तेलुगूसाठी TEL, तमिळसाठी TAM, मल्याळमसाठी MAL आणि बंगालीसाठी BEN लिहून पाठवावे लागणार आहेत. -युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) वर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरून एसएमएस पाठवावा लागेल. -EPFO तुमचे शेवटचे पीएफ योगदान, बॅलेन्स आणि उपलब्ध केवायसीची माहिती तुमच्या मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवेल.