JOIN US
मराठी बातम्या / मनी / ITR Refund स्टेटस दोन प्रकारे ऑनलाइन करता येईल चेक, सोपी आहे प्रोसेस!

ITR Refund स्टेटस दोन प्रकारे ऑनलाइन करता येईल चेक, सोपी आहे प्रोसेस!

ITR Refund : आयटीआर भरण्यासाठी डेडलाइन जवळ येत आहे. काहींनी अद्यापही आयटीआर भरलेला नाही. तर काहींनी आयटीआर दाखल केलाय पण रिफंड आलेलं नाही. त्याचं स्टेटस कसं चेक करायचं जाणून घेऊया.

जाहिरात

आयटीआर रिफंड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जुलै : इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची अखेरची तारीख 31 जुलै आहे. अनेक लोकांनी आतापर्यंत रिटर्न फाइल केला आहे. आता त्यांना आपला रिफंड कधी येतो याची प्रतीक्षा आहे. आयटीआर चं ई-व्हेरिफिकेशन होण्याच्या 20 ते 60 दिवसांच्या आत सामान्यतः रिफंड येतो. तुम्ही तुमचं रिफंड स्टेटस ऑनलाइन चेक करु शकता. तुम्ही इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस एक तर एनएसडीएलच्या वेबसाइटवर जाऊन किंवा आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर व्हिजिट करुन चेक करु शकता.

2 जुलै 2023 पर्यंत, मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी सुमारे 1.32 कोटी ITR दाखल करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे 1.25 कोटी आयकर रिटर्न व्हेरिफाय करण्यात आले आहेत. असेसमेंट ईयर 2023-24 साठी आतापर्यंत फक्त 3,973 व्हेरिफाइड झाले आहेत. आयटीआर भरल्यानंतर तुम्ही तुमचा ई-मेल वेळोवेळी तपासत राहणे आवश्यक आहे. कारण आयकर विभाग आयकरदात्यांना फक्त ई-मेलद्वारे आयटीआरची माहिती देतो. Tax Deduction Claim: दान-पुण्य करणाऱ्यांना मिळते टॅक्स सूट! पाहा क्लेम कसं करायचं? ई-पोर्टलवर स्टेटस कसं चेक करायचं तुम्ही तुमच्या वास्तविक कर दायित्वापेक्षा जास्त कर भरला असल्यास, तुम्ही ITR दाखल करून रिटर्न मिळवू शकता. यासाठी सर्वप्रथम www.incometax.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर जा. यानंतर क्विक लिंक सेक्शनवर क्लिक करा. आता खाली स्क्रोल करा आणि थोडे खाली गेल्यावर तुम्हाला ‘नो योर रिफंड स्टेटस’ दिसेल. आता त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर, असेसमेंट ईयर आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. हे सर्व केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तुम्ही नेमलेल्या ठिकाणी OTP टाकताच तुम्हाला रिफंडचं स्टेटस दिसेल. तुम्हाला ITR बँक डिटेल्समध्ये काही समस्या असल्यास, स्क्रीनवर दिसेल की कोणतेही रेकॉर्ड सापडले नाही. ITR भरण्यासाठी उरले फक्त 27 दिवस! फॉर्मध्ये झालेय हे बदल; अन्यथा एका चुकीमुळे येईल नोटीस NSDL वेबसाइटवर रिफंडचं स्टेटस चेक करण्याची प्रोसेस काय? -https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html ला भेट द्या. -आता PAN, मूल्यांकन वर्ष आणि कॅप्चा टाका आणि ‘प्रोसीड’ वर क्लिक करा. -तुम्हाला ज्या असेसमेंट ईयरसाठी रिफंडचं स्टेटस चेक करायचं आहे ते सिलेक्ट करा. -कॅप्चा कोड टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा. -तुमच्या आयटीआर रिफंडचं स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या