मुंबई : हर्ष इंजीनियर्सचा आज आयपीओ लिस्ट होणार आहे. तुम्ही जर यामध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. हर्षा इंजिनियर्सच्या IPO चं आज लिस्टिंग होणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार याचे शेअर्सचं प्रीमियमवर लिस्टिंग केलं जाऊ शकतात. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 40%-50% च्या प्रीमियमवर लिस्ट होऊ शकतात. कंपनीची इश्यू प्राईज 330 रुपये आहे. त्यानुसार हर्षा इंजिनियर्सच्या शेअर्सची शेअर मार्केट मध्ये लिस्ट 460-500 रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ६० टक्के प्रीमियमने ट्रेडिंग करत होते. पण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे प्रीमियम खाली आला आहे. अमेरिका फेड रिझर्व्ह बँकेनं सलग तिसऱ्यांदा व्याजदर वाढवलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाला आहे. शेअर मार्केट ४ टक्क्यांनी खाली आलं आहे. Harsha Engineers चं सुरुवातीचं सबस्क्रिप्शन चांगलं होतं. त्यामुळे लिस्टिंग प्रीमियरची अपेक्षा होती. हर्षा इंजिनियर्सच्या आयपीओला शेवटच्या दिवसापर्यंत 75 पट अधिक बोली लागल्या. आतापर्यंतचा वर्षातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेला आयपीओ बनला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, IPO अंतर्गत एकूण 1.68 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत, ज्याच्या विरोधात एकूण 125.96 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. (QIBs) आरक्षित कोट्यामध्ये कंपनीला सर्वाधिक बोली 178.26 पट मिळाली, (NIIs) त्यांच्या कोटा शेअर्सच्या 71.32 पट ओव्हरसबस्क्राइब केले. हेम सिक्युरिटीजच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक आस्था जैन म्हणतात, “हर्ष इंजिनियर्सचे शेअर्स 40-45% च्या प्रीमियमवर लिस्टिंग होण्याची पेक्षा आहे.
मेहता इक्विटीजचे वरिष्ठ व्हीपी रिसर्च प्रशांत तापसी म्हणाले की, बाजारात अलीकडच्या काळात अस्थिरता असूनही हर्षा इंजिनियर्सची लिस्टिंग मजबूत असू शकते. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 480-500 रुपयांना लिस्ट होऊ शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर त्याची इश्यू किंमत 330 रुपये आहे.