JOIN US
मराठी बातम्या / मनी / पाम तेलावरील आयात करात मोठी वाढ, तुमच्यावर काय होणार परिणाम?

पाम तेलावरील आयात करात मोठी वाढ, तुमच्यावर काय होणार परिणाम?

देशांतर्गत शेतकऱ्यांचे हित पाहता सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : शेतकऱ्यांच्या हिताचा सरकारने निर्णय घेतला आहे. बाहेरून आयात होणाऱ्या पाम तेलावर आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. देशांतर्गत शेतकऱ्यांचे हित पाहता सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. CNBC आवाजने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचा थेट परिणाम आपल्यावर होण्याची शक्यता आहे. सरकारने पाम तेलाच्या आयातीवरील शुल्कात 6-11% वाढ केली आहे. सरकारने जारी केलेल्या सूचनेत कच्च्या पामतेलावरील दर 858 डॉलरवरून 952 डॉलर प्रति टन करण्यात आला आहे.

कार घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आजपासून बदलला नियम

याशिवाय आरबीडी पामतेलावरील दर 905 डॉलरवरून 952 डॉलर प्रति टन करण्यात आला आहे. इतर पामतेलाला पूर्वी प्रतिटन 822 डॉलर शुल्क आकारण्यात येत होतं.मात्र आता ते 957 डॉलर प्रतिटन शुल्क लावण्यात आलं आहे. मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेन या देशांमधून भारतात पामतेल आयात होतं. याचा उपयोग अनेक वस्तूंमध्ये अगदी खाद्यपदार्थांमध्ये देखील केला जातो. या तेलाला विशिष्ट प्रकारचा गंध नसतो. त्यामुळे अगदी साबण आणि शांम्पूपासून ते खाद्यतेलापर्यंत अनेक ठिकाणी याचा वापर होतो. पामतेलाच्या किंमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे भारतात तयार होणाऱ्या तेलांना मोठं मार्केट मिळेल आणि लोक त्याच्याकडे वळतील असा विश्वास आहे. पामतेलाच्या किंमती वाढल्याने अनेक गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक LPG सिलिंडरचे दर घसरले, घरगुती गॅसचं काय? पाहा तुमच्या शहरातले दर

संबंधित बातम्या

पामतेल शॅम्पू, बाथ सोप, टूथपेस्ट, व्हिटॅमिनच्या गोळ्या, मेकअपच्या गोष्टीही बनवते. चॉकलेट उद्योगात पाम तेलाचा खूप वापर केला जातो. पेट्रोल आणि डिझेलमध्ये जे सेंद्रिय इंधन किंवा जैव इंधन म्हणून वापरलं जातं ते खरं तर पामतेल असते.

पामतेलाचा वापर जगभरातील अनेक घरगुती उत्पादनांमध्ये केला जातो, त्यामुळे त्याच्या किंमती वाढवल्याचा परिणाम या सर्वांवर होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या