Gold-Silver Price Today
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: आज सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold silver price) आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.6% नी कमी होऊन 46,377 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर देखील (silver price) गुरुवारी कमी झाले आहेत. अलीकडच्या काही महिन्यातील ही चांदीतील सर्वाधिक घसरण आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर स्थिर बंद झाले होते तर चांदी 1.2 टक्क्यांनी वधारली होती. सराफा बाजारात गेल्या आठवडाभरात रेड झोन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. स्पॉट गोल्डची किंमत 0.3 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1,762.33 डॉलर प्रति औंस झाली आहे. डॉलर इंडेक्स एका महिन्याच्या उच्च स्तरावर आहे. हे वाचा- Good News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार तुमच्या शहरातील भाव गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,360 रुपये प्रति (Gold rate on 23 September) तोळा आहे. तर चांदीचे दर 1100 रुपयांच्या तेजीनंतर 60,900 रुपये प्रति किलोवर आहेत. नवी दिल्ली आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 46,000 रुपये आणि 45,360 रुपये प्रति तोळा आहे. वेबसाइटच्या मते चेन्नईमध्ये हा दर 44,110 रुपये प्रति तोळा आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,180 रुपये प्रति तोळा आहे तर मुंबईत सोन्याचा दर 46,360 रुपये प्रति तोळा आहे. गुंतवणुकीची योग्य संधी तज्ज्ञांच्या मते, एमसीएक्सवर सोन्याचे दर 46800-47055 रुपयांच्या आसपासच राहतील. तर चांदीचे दर 61000-61400 रुपयांच्या स्तरावर राहण्याची शक्यता आहे. मार्केट तज्ज्ञांच्या मते सोन्यामध्ये गुंतवणुकीची ही योग्य संधी आहे. हे वाचा- तुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.