• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • तुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; मोठी होताच या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये

तुमच्या कन्यारत्नासाठी आजच सुरु करा बचत; मोठी होताच या योजनेतून मिळतील तब्बल 65 लाख रुपये

सध्या या योजनेअंतर्गत 7.6 टक्के दराने व्याज दिलं जात आहे. हा व्याज दर पीपीएफपेक्षाही जास्त आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: आपल्याला मूल झालं, की घर आनंदाने भरून जातं. त्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही; मात्र मूल झाल्यानंतर आपली जबाबदारीही वाढत जाते. सध्याच्या काळात महागाई आणि खर्च इतके वाढत आहेत, की मुलांसाठी स्वतंत्र गुंतवणूक (Investment for children) करण्याशिवाय पर्यायच नसतो. त्याचं नियोजन मुलांच्या जन्मापासूनच करणं अत्यावश्यक असतं. मुलगा-मुलगी कोणीही झालं असेल, तरी त्यांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी पीपीएफसारखे काही चांगले पर्याय आहेत; मात्र मुलगी (Investment for Girl Child) झाली असेल, तर तिच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) सर्वोत्तम आहे. या योजनेची माहिती 'आज तक'ने या प्रसिद्ध केली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही लहान मुलींसाठी (Girl Child) केंद्र सरकारने (Central Government) सुरू केलेली बचत योजना आहे. ही योजना 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली. छोट्या बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना सर्वांत चांगला व्याज दर (Interest Rate) देणारी योजना आहे. सध्या या योजनेअंतर्गत 7.6 टक्के दराने व्याज दिलं जात आहे. हा व्याज दर पीपीएफपेक्षाही जास्त आहे. सुकन्या समृद्धी योजनेत कोणत्याही एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणं गरजेचं आहे. याचाच अर्थ असा, की रोज केवळ एक रुपयाची बचत करूनही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही एका आर्थिक वर्षात एसएसवाय (SSY) खात्यात एका वेळी किंवा अनेक वेळा मिळून 1.5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येत नाही. या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 80 सीअंतर्गत या योजनेतल्या दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीला आयकरातून (Income Tax) सूट मिळते. हे वाचा - paytm ने आणलं आता वॉलेट कार्ड; अशा पद्धतीनं ऑफलाईनही करता येईल पेमेंट या योजनेअंतर्गत खातं उघडायचं असल्यास मुलगी 10 वर्षांची होण्याच्या आत सुरू करावं लागतं. खातं सुरू केल्यापासून मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत ते सुरू राहतं. हे खातं जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावे सुरू करता येतं. योजनेत खातं उघडल्यापासून सुरुवातीची 15 वर्षं त्यात पैसे भरावे लागतात. नंतर मॅच्युरिटीपर्यंत व्याज मिळत राहतं. मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षानंतर मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी 50 टक्क्यांपर्यंत रक्कम या योजनेतून काढता येते. मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षी ते खातं मॅच्युअर होतं आणि पैसे काढून घेता येतात. मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षानंतर आणि 21व्या वर्षाच्या आधी तिचं लग्न झाल्यास त्या वेळीही संपूर्ण रक्कम काढता येते. या योजनेत मिळणारं व्याज करमुक्त असतं, तसंच योजनेच्या शेवटी काढली जाणारी रक्कमही करमुक्त असते. समजा, तुम्ही या योजनेत प्रतिमहिना 3000 रुपये गुंतवणूक (Investment) करत असाल, तर वर्षाला 36,000 रुपये जमतील. तसं झालं, तर 21व्या वर्षी म्हणजे मॅच्युरिटीनंतर (Maturity) ही 15,22,221 रुपये एवढी रक्कम मिळेल. एखाद्या व्यक्तीने या खात्यात दर वर्षी 1.5 लाख रुपये भरले, तर 15 वर्षांत 22.5 लाख रुपये जमा होतील. मुलगी 21 वर्षांची होऊन जेव्हा खातं बंद केलं जाईल, तेव्हा तिला तब्बल 65 लाख रुपये मिळतील. (हे गणित सध्याच्या 7.6 टक्के व्याजदराने केलं आहे.) चक्रवाढ दराने व्याजाचा हा फायदा आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं पोस्ट ऑफिस किंवा सरकारी किंवा काही कमर्शिअल बॅंकांच्या शाखेत सुरू करता येतं. त्यासाठी मुलीचा जन्मदाखला आणि मुलीच्या आई-वडिलांची ओळखपत्रं, पत्त्याचा पुरावा आदी कागदपत्रं द्यावी लागतात.
  First published: