JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्यामध्ये तेजी येऊनही 9000 रुपयांनी कमी आहेत दर, चांदीही वधारली

Gold Price Today: सोन्यामध्ये तेजी येऊनही 9000 रुपयांनी कमी आहेत दर, चांदीही वधारली

Gold Price Today: आज भारतीय सराफा बाजारात सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) तेजी पाहायला मिळाली आहे. असे असूनही रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 9000 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट: आज भारतीय सराफा बाजारात सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) तेजी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange MCX) वर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्यात 0.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या किंमतीत  0.19 टक्क्यांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याचे दर आज वाढलेले असूनही रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 9000 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आता सराफा बाजारात सोन्याचे दर 47,286 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात जवळपास 9000 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत. काय आहेत सोन्याचांदीचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीचे सोन्याचे दर 0.25 टक्क्यांच्या वाढीनंतर  47,286 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर आज चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर आज 0.19 टक्क्यांनी वाढून  62,251 रुपये प्रति तोळा झाले आहेत. हे वाचा- PNB ग्राहकांसाठी खूशखबर! गृहकर्ज घेताना मिळणार ही सवलत, 30 सप्टेंबर शेवटची तारीख सोन्याचे दर गाठणार 50000 चा टप्पा तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरू शकेल. कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. हे वाचा- SBI ग्राहकांसाठी ऑफर्सचा धमाका! गृहकर्जासह कार-गोल्ड आणि पर्सनल लोनवर मोठी सवलत या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या