JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत 10000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत 10000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 10000 रुपयांनी कमी आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जुलै: सोन्याचांदीच्या दरात (Gold Price Today) आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. तुम्ही जर सोनेचांदीची खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज 22 कॅरेट सोन्याचे दर  46,710 रुपये प्रति तोळावर आहेत. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज कमजोरी पाहायला मिळते आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर सोन्याचे दर (Gold Rates) 56000 पेक्षा जास्त होते. यावेळी रेकॉर्ड स्तरावर (Record High) दर पोहोचले होते. तर गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज सोन्याचे दर 46,710 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहेत. अर्थात आता सोन्याचे दर 10,000 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहेत. याठिकाणी तपासा सोन्याची किंमत (Gold Price Today, 13 July 2021) दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत  46,800 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईमध्ये सोन्याची किंमत 46,710 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये सोन्याचे दर 45,070 रुपये आणि 47,370 रुपये प्रति तोळा आहे. 24 कॅरेट सोन्याच्या किंमती दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये अनुक्रमे 50,850 रुपये, 47,710 रुपये, 49,170 रुपये, 50,070 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा- EPFO:नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी;या 5 चुकांमुळे काढता येणार नाही PF रक्कम चांदीचे दर (Silver Price Today, 13 July 2021) दिल्लीमध्ये 69,100 रुपये प्रति किलो मुंबईमध्ये 69,100 रुपये प्रति किलो चेन्नईमध्ये 73,800 रुपये प्रति किलो कोलकातामध्ये 69,100 रुपये प्रति किलो हे वाचा- डूल, चमकी, नथ अशा हलक्या दागिन्यांवर परिणाम; Gold Hallmarking चे नवे नियम कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या