JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: आज खरेदी करता येईल 7921 रुपयांनी स्वस्त सोनं, इथे तपासा लेटेस्ट भाव

Gold Price Today: आज खरेदी करता येईल 7921 रुपयांनी स्वस्त सोनं, इथे तपासा लेटेस्ट भाव

Gold price today: मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 0.05 टक्के घसरण झाली आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 48270 रुपये प्रति तोळा आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जुलै: सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या दरात (Gold Rates) 0.05 टक्के घसरण झाली आहे. ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 48270 रुपये प्रति तोळा आहेत. आजचा सर्वोच्च दर 48298 रुपये आहे तर निचांकी दर  48254 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय चांदीच्या दरात आज तेजी पाहायला मिळाली. आज चांदीचे दर (Silver Price Today) 0.12 टक्क्यांनी अर्थात 86 रुपयांनी वधारले आहेत. ज्यामुळे चांदीचे दर (Silver Price) 69498 रुपये प्रति किलोच्या स्तरावर आहेत. 2020 बाबत बोलायचे झाले तर गेल्यावर्षी सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर एमसीएक्सवर 56191 रुपये प्रति तोळा होते. आज सोन्याची वायदे किंमत 48270 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात आज सोनं 7921 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहे. हे वाचा- RBI ने रद्द केला राज्यातील या बँकेचा परवाना, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Rates in International Market) 1,824.81 डॉलर प्रति औंस आहेत. तर चांदीचे दर 0.3 टक्क्यांनी कमी होऊन 26.16 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर प्लॅटिनमचे दर 0.5 टक्क्यांनी कमी होऊन  1,123.83 डॉलरवर पोहोचले आहेत. उद्यापर्यंत आहे स्वस्त सोनेखरेदीची संधी तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणूक  (Investment in Gold) करण्यासाठी स्वस्त मार्ग शोधत असाल, तर सरकारची सॉव्हरेन होल्ड बाँड स्कीम (Sovereign Gold Bond scheme) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  12 जुलैपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) सब्सक्रिप्शनसाठी खुली झाली आहे. हे वाचा- या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव DA, वाचा या निर्णयासंदर्भात 10 महत्त्वाचे मुद्दे या अंतर्गत स्वस्त सोन्याची विक्री होईल. ही विक्री 16 जुलैपर्यंत होणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या या सीरिजमधील सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने आरबीआय (Reserve Bank of India) सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond SGB) जारी करतं. तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या सविस्तर माहिती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या