Gold-Silver Price Today
नवी दिल्ली, 14 जुलै: सोन्याच्या किंमतीसह आज बुधवारी चांदीच्या दरातही (Gold-Silver Price Today, 14 July 2021) वाढ झाली आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) प्रति तोळा सोन्याचे दर 0.19 टक्क्यांनी वाढले आहेत. तर चांदीच्या दरात 0.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत जवळपास 100 रुपयांनी वाढली आहे. यानंतर सोन्याचे दर (Gold latest price) 47,981 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहेत. याशिवाय चांदीबाबत बोलायचे झाले तर यामध्ये देखील किरकोळ वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचांदीचा आजचा दर (Gold-Silver Price Today, 14 July 2021) आज एमसीएक्सवर (MCX) ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्यामध्ये 0.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर 47,981 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.03 टक्क्यांनी वाढल्यानंतर 69,100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. हे वाचा- Success Story: देशातील सर्वात मोठा IPO आणणारी कंपनी Paytm ची यशोगाथा रेकॉर्ड हायपेक्षा आताही स्वस्त आहेत सोन्याचे दर गेल्यावर्षीच्या ऑगस्टच्या सोन्याच्या किंमतीबाबत (Gold Rates in August 2020) बोलायचे झाले तर या कालावधीमध्ये एमसीएक्सवर सोन्याचे दर 56191 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होतो. आज ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत एमसीएक्सवर 47,981 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा खूप स्वस्त आहेत. **हे वाचा-** Zomato पाठोपाठ ही कंपनी देत आहे कमाईची संधी! या तारखेपासून IPOमध्ये करा गुंतवणूक कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल