JOIN US
मराठी बातम्या / मनी / या वर्षी जागतिक मंदीची शक्यता, मात्र भारताला होणार फायदा...

या वर्षी जागतिक मंदीची शक्यता, मात्र भारताला होणार फायदा...

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मुख्य अर्थशास्त्री सर्वेक्षणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. सर्वेक्षणात या वर्षी जागतिक मंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घ्या सर्वेक्षणात कोणत्या गोष्टी समोर येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जानेवारी: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने सोमवारी आपल्या चीफ इकॉनॉमिस्ट फोरकास्ट सर्व्हेमध्ये एक मोठा खुलासा केला आहे. सर्वेक्षणात या वर्षी 2023 मध्ये जागतिक मंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच या मंदीत भारता ला फायदा होत असल्याची बाब समोर येत आहे. WEF ची वार्षिक बैठक दावोस, स्वित्झर्लंड येथे होणार असल्याची माहिती आहे. ही 5 दिवसीय बैठक 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या बैठकीची थीम ‘कोऑपरेशन इन अ फ्रॅगमेंटेड वर्ल्ड’ ठेवण्यात आली आहे. या बैठकीत युक्रेन चे संकट, जागतिक चलनवाढ, हवामान बदल या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारताला होऊ शकतो फायदा

2023 मध्ये जागतिक मंदी येण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. मात्र या काळात अन्न, ऊर्जा आणि महागाईचा दबाव शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र बांगलादेश आणि भारतासह दक्षिण आशिया क्षेत्रातील काही अर्थव्यवस्थांना जागतिक ट्रेंडचा फायदा होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे. जागतिक व्यापार जगतात चढ-उताराचे वातावरण राहील. त्यामुळे जागतिक स्तरावर वस्तूंच्या आयात-निर्यातीत घट होणार आहे.

युरोप आणि अमेरिकेच्या ग्रोथ वर परिणाम होईल

सर्वेक्षण केलेल्या सर्व मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी 2023 मध्ये युरोपमध्ये कमकुवत किंवा अत्यंत कमकुवत ग्रोथ होण्याची शक्यता व्यक्त केली. अमेरिकेबद्दल, 91% प्रतिसादकर्त्यांनी कमी वाढीची शक्यता वर्तवली आहे. मुख्य अर्थतज्ञ चीनच्या विकास दरावर समान रीतीने विभागलेले आहेत. काहींना वाटते की मजबूत वाढ होईल, तर काहींना वाटते की, ग्रोथ खूप कमी असेल. Agriculture Loan : बळीराजाला अगदी सहज मिळणार कर्ज, SBI ने घेतला मोठा निर्णय  

बैठकीची तयारी पूर्ण

दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या सुरक्षेसाठी स्वित्झर्लंडने पूर्ण तयारी केली आहे. जगभरातील हजारो नेत्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, या छोट्याशा शहराचे पूर्ण तयारी केली जात आहे. या कामासाठी हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये लष्करातील 5,000 हून अधिक लोक आणि नागरी संरक्षण सेवेतील शेकडो स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. त्यांनी WEF बैठकीसाठी ख्रिसमसच्या आधी काम सुरू केले. सरकारने 10-26 जानेवारी दरम्यान 5,000 कर्मचारी तैनात केले आहेत. TAX वाचवण्याचा सिक्रेट फंडा, एकदा समजून घ्याल तर म्हणाल….  

भारतातील अनेक नेते राहणार उपस्थित

या बैठकीत भारतातील अनेक व्यक्ती आणि नेते उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, स्मृती इराणी आणि आरके सिंह यांचा समावेश असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीएस बोम्मई आणि योगी आदित्यनाथ हेही दुसऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, राजेश गोपीनाथ, सीपी गुरनानी, ऋषद प्रेमजी, विजय शेषर शर्मा, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या