JOIN US
मराठी बातम्या / मनी / या बँकेच्या ग्राहकांना झटका! 1 जुलैपासून पैसे जमा करण्यासाठी लागणार शुल्क, चेकबुक संदर्भातील नियम बदलणार

या बँकेच्या ग्राहकांना झटका! 1 जुलैपासून पैसे जमा करण्यासाठी लागणार शुल्क, चेकबुक संदर्भातील नियम बदलणार

आयडीबीआय बँक 1 जुलैपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल करत आहे. बँकेने शुक्रवारी चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जून: ग्राहकांच्या सोयीसाठी, फसवणूक टाळण्यासाठी त्याचप्रमाणे आर्थिक स्थितीनुसार बँकांच्या नियमांमध्ये बदल केले जातात. असेच काही महत्त्वाचे बदल IDBI बँकेमध्ये केले जाणार आहेत. आयडीबीआय बँक (IDBI Bank) 1 जुलैपासून काही महत्त्वाच्या नियमात बदल करत आहे. बँकेने शुक्रवारी चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केला आहे. ग्राहकांना आता केवळ दर वर्षाला 20 पानांचं चेक बुक (Cheque Book) मोफत मिळेल. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक चेकसाठी 5 रुपये शुक्ल द्यावे लागणार आहे. सुधारणा केलेले हे शुल्क पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत. आतापर्यंत खाते उघडण्याच्या पहिल्या वर्षात बँकेच्या ग्राहकांना 60 पानांचे चेकबुक विनामूल्य मिळत असे. त्यानंतरच्या वर्षांमध्ये बँक 50 पृष्ठांचं चेकबुक देते. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी ग्राहकाला पाच रुपयांचं शुल्क द्यावं लागतं. दरम्यान सुधारित फी 1 जुलै 2021 पासून लागू होईल असे बँकेने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. पण हा नवीन नियम ‘सबका सेव्हिंग्ज अकाउंट’अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना लागू होणार नाही आणि त्यांना वर्षभर अमर्यादित विनामूल्य धनादेश मिळतील. हे वाचा- खूशखबर! ही बँक त्यांच्या ग्राहकांना देत आहे मोफत रेशन, वाचा कुणाला मिळतोय लाभ? 1 जुलैपासून कोणते नियम बदलणार -आयडीबीआय बँक ग्राहकांना आता दर वर्षात केवळ 20 पानांचं चेकबुक मोफत मिळेल. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी त्यांना पाच रुपये शुल्क द्यावे लागेल. -रोख रक्कम (होम आणि नॉन होम) जमा करण्यासाठी, विविध बचत खात्यांसाठी अर्ध-शहरी आणि ग्रामीण शाखांकरिता दरमहा मोफत सुविधांची संख्या कमी करुन अनुक्रमे 7 आणि 10 वरून पाच करण्यात आली आहे. हे वाचा- ATM मधून पैसे काढणं महागलं, या पद्धती वापरल्यास द्यावं लागणार नाही शुल्क -सुपर सेव्हिंग प्लस खात्यांसाठी अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागातील विनामूल्य व्यवहार आताच्या अनुक्रमे 10 आणि 12 च्या तुलनेत आता प्रत्येक 8 असतील. -ज्युबिलीप्लस ज्येष्ठ नागरिक खातेदारांच्या खात्यात मासिक सरासरी शिल्लक (monthly average balance) 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर लॉकर भाड्यात कोणतीही सूट मिळणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या