JOIN US
मराठी बातम्या / मनी / PNB मध्ये FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या Fixed Deposit नवे व्याजदर

PNB मध्ये FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या Fixed Deposit नवे व्याजदर

देशातील महत्त्वाची सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने देखील एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. सध्या पीएनबी 2.9% ते 5.25% पर्यंच व्याज देते आहे.

जाहिरात

Fixed deposit

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर फिक्स्ड डिपॉझिट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus) अधिकतर गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे. यापैकी बरेचजण कमी जोखीम (Low Risk)आणि अधिक रिटर्न (Return) देणाऱ्या पर्यायांना पसंती देतात. अशावेळी फिक्स्ड डिपॉझिट (Bank Fixed Deposit) हा अनेकांच्या आवडीचा पर्याय आहे. मात्र गेल्या काही काळापासून बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. दरम्यान देशातील महत्त्वाची सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने देखील एफडीवरील व्याजदरात (PNB FD Rates) बदल केले आहेत. सध्या पीएनबी 2.9% ते 5.25% पर्यंच व्याज देते आहे. PNB मध्ये FD वर विविध कालावधीसाठी काय आहे व्याजदर?

>7 ते 45 दिवसांच्या एफडीवर व्याज- 2.9% > 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर व्याज - 3.25% > 91 ते 179 दिवसांच्या एफडीवर व्याज - 3.80% > 180 ते 270 दिवसांच्या एफडीवर व्याज - 4.4%

हे वाचा- सरकारी बँकेतील कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास कुटुंबाला मिळणार 30 टक्के अधिक पेन्शन

> 271 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक पण 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर व्याज - 4.4% > 1 वर्षाच्या एफडीवर व्याज - 5% > 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंच्या एफडीवर व्याज - 5% > 2 वर्षापेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंच्या एफडीवर व्याज - 5.10% > 3 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंच्या एफडीवर व्याज - 5.25% > 5 वर्षापेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंच्या एफडीवर व्याज - 5.25%

हे वाचा- Flipkart नवी योजना, घेऊ शकता 2 लाखांपर्यंतचं इंटरेस्ट फ्री Loan ज्येष्ठ नागरिकांना मिळेल अधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर 0.50 टक्क्यांच्या अधिक व्याजदर मिळेल. सध्याच्या दरापेक्षा 0.50 टक्के अधिक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 3.40% ते 5.75% पर्यंत व्याज मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या