JOIN US
मराठी बातम्या / मनी / RBI च्या या निर्णयामुळे सामान्यांना बसू शकतो मोठा झटका, FD वर कमी फायदा मिळण्याची शक्यता

RBI च्या या निर्णयामुळे सामान्यांना बसू शकतो मोठा झटका, FD वर कमी फायदा मिळण्याची शक्यता

आरबीआयच्या रेपो रेट संदर्भातील निर्णयामुळे छोट्या कंपन्या, बँका तसच कर्ज परतफेड करणाऱ्यांना फायदा होईल. मात्र एफडी (Fixed deposit FD) करणाऱ्यांवर देखील याचा परिणाम होणार आहे

जाहिरात

व्यवहारात जास्त किंमतीच्या नोटा नसाव्यात असं म्हटलं जातं. अशा नोटा असल्या तर काळापैसा जास्त साठवला जातो असं म्हटलं जातं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मे : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (RBI Governor Shaktikant  Das) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रेपो रेट संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.40 टक्के म्हणजेच 40 बेसिस पॉईंट्सने कपात केली आहे. त्यामुळे कर्जावरील EMI कमी होणार आहे. या निर्णयामुळे छोट्या  कंपन्या, बँका तसच कर्ज परतफेड करणाऱ्यांना फायदा होईल. मात्र एफडी (Fixed deposit FD) करणाऱ्यांवर देखील याचा परिणाम होणार आहे. इकोनॉमिक टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार बँका कर्जाच्या व्याजदरांवर त्यांच्या मार्जिनमध्ये कपात करू शकते. यामुळे कर्जाच्या दर देखील कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांचा फायदा देखील कमी होण्याची शक्यता आहे. (हे वाचा- व्याजदरात कपात तर आणखी 3 महिने EMI देण्यासाठी सूट, RBI च्या 6 मोठ्या घोषणा ) तज्ज्ञांच्या मते आरबीआयच्या या निर्णयामुळे बँक डिपॉझिटवरील व्याज दर देखील कमी करू शकतात. अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त लिक्विडिटीमुळे व्याजदरांवर दबाव वाढू शकतो. एफडीवरील व्याज 0.25 % ते 0.50 % ने घटण्याची शक्यता आहे. आरबीआयने याआधी जेव्हा व्याजदरांमध्ये 0.75 टक्क्यांनी कपात केली होती,  तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर काही बँकांनी त्यांचे एफडीवरील व्याजदर घटवले होते. 12 मे रोजी एसबीआयने 3 वर्षांच्या एफडीसाठी असणाऱ्या व्याजदरात 0.20 टक्क्यांनी कपात केली होती. मात्र 3 ते 10 वर्षांसाठी असणाऱ्या एफडीवरील व्याजदरात कोणतीही कपात केली नव्हती. यावेळी बँकेने निवेदन देत सांगतले होते की, सिस्टिम आणि बँक लिक्विडिटी लक्षात घेता आम्ही 3 वर्षाच्या रिटेल टर्म डिपॉझिट्स रेटमध्ये ही कपात करत आहोत. (हे वाचा- RBI ने केली रेपो रेटमध्ये कपात, आता सर्व कर्जावरील EMI होणार स्वस्त ) त्यामुळे गुंतवणूक करता गुंतवणूकदारांनी त्यांची जोखीम पत्करण्याची क्षमता तपासून पाहणे आवश्यक आहे. जेव्हा व्याजदरात कपात होते त्यावेळी गुंतवणूकदारांना त्यांना मिळणारा रिटर्नऐवजी त्यांंच्या पैशांच्या सुरक्षेविषयी विचार करणे आवश्यक आहे. संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या