मुंबई : कोरोना काळात अनेक जण डिजिटल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगकडे वळले आहेत. तसं असलं तरी अजूनही काही कामं अशी असतात जी बँकेत गेल्याशिवाय काही केल्या पूर्णच होत नाहीत. अशा सगळ्या कामांना तुम्ही एकतर आजच पूर्ण करा किंवा 6 दिवस थांबा असं म्हणण्याचं कारण म्हणजे पुढचे 6 दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकेत जाऊनच सेटलमेंट करावी लागणारं एखादं महत्त्वाचं काम असेल तर ते आजच करायला हवं. आज चुकलात तर आठवडाभर वाट पाहावी लागेल. कारण सणासुदीच्या काळात उद्यापासून पुढील 6 दिवस बँकांमध्ये बँकांना बंद असणार आहेत. धनतेरस, दिवाळी, भाऊबीज अनेक सण या आठवड्यात आहेत. त्यानंतर शनिवार आणि रविवार या कारणामुळे बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक दरवर्षी सुट्ट्यांचं कॅलेंडर जारी करते. आरबीआयने जाहीर केलेल्या अनेक सुट्ट्या राष्ट्रीय पातळीवरील आहेत.
धक्कादायक! 75 टक्के ट्वीटर कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात?त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील असतात. त्या काळात केवळ त्याच्याशी संबंधित राज्यांमध्येच बँकांच्या शाखा बंद असतात. वेगवेगळ्या राज्यांच्या सुट्ट्यांची यादीही वेगवेगळी असते.
…म्हणून आता स्वस्त सोने खरेदीचे युग संपणार का? वाचा, सविस्तरबँकांच्या ऑनलाइन सेवा या कालावधीमध्ये सुरू राहणार आहेत. मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंगमुळे ग्राहकांच्या अनेक समस्या सुटतील. बँका सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन सेवा देतात. त्यामुळे बँक सुट्टीच्या दिवशी आवश्यक ते बँकिंगचे काम असेल तर बँकेच्या ऑनलाइन सेवांची माहिती घ्यावी. कदाचित तुम्हाला करावी लागणारी कामे ऑनलाइन होऊ शकतील. 22 ऑक्टोबर : धनत्रयोदशी या दिवशी असतो. देशभरातील बँका बंद राहणार आहेत. या दिवशी महिन्याचा चौथा शनिवारही असतो. 23 ऑक्टोबर : रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असते. देशभरात बँकिंग कामकाज बंद राहणार आहे. 24 ऑक्टोबर : देशात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. गंगटोक, हैदराबाद, इंफाळ वगळता संपूर्ण भारतात बँका बंद राहणार आहेत. 25 ऑक्टोबर : गंगटोक, हैदराबाद, इंफाळ, जयपूर इथे लक्ष्मी पूजा/दिवाळी/गोवर्धन पूजा यासाठी बँक बंद राहणार आहे 26 ऑक्टोबर : अहमदाबाद, बेलापूर, बेंगळूरु, देहरादून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, शिमला, श्रीनगर बँका बंद 27 ऑक्टोबर : गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊ बँका बंद असणार