मुंबई: एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचं सावट आहेत दुसरीकडे नोकरी जाण्याचं टेन्शन वाढलं आहे. टेस्लाचे CEO एलन मस्क यांच्या 44 अब्ज डॉलर्सच्या ट्विटर कराराची बरीच चर्चा झाली. हा करार पूर्ण झाल्यास अब्जाधीश मस्क सोशल मीडिया कंपनी ट्विटरमधून 75 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. याबाबत सध्या खूप चर्चा सुरू झाली आहे. 75 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. मस्क यांनी ट्विटर इंक विकत घेण्याच्या आपल्या करारात संभाव्य गुंतवणूकदारांना सांगितले की, सोशल मीडिया कंपनीच्या 75 टक्के कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत आहे. याबाबत स्थानिक मीडियानेही वृत्त दिल्याची माहिती मिळाली आहे.
तुमच्या सॅलरीचाच भाग असतो का बोनस? कोणाला किती द्यावा हे कसं ठरवलं जातं?वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, येत्या काही महिन्यांत कंपनीची मालकी कोणाचीही असो, नोकऱ्यांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या पेरोलमध्ये सुमारे 800 दशलक्ष डॉलर्सची कपात होण्याची शक्यता आहे. सध्या ट्विटरने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आधी ओलाच्या कर्मचाऱ्यांना काढण्याबाबतची चर्चा रंगली होती. आता ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. मस्क यांचा करार होण्याआधीपासूनच ही योजना तयार केली जात असल्याचं वाशिंगटन पोस्टच्या अहवालातून समोर आलं आहे. एकीकडे आर्थिक मंदीचं सावट असताना कर्मचाऱ्यांची नोकरी जाणं म्हणजे डोक्याला ताप असाच प्रकार आहे.
तुम्हाला मिळणाऱ्या ‘बोनस’ची सुरुवात नक्की कशी झाली?बुधवारी मस्क यांनी ट्विटर डीलबाबत मोठं विधान केलं. ट्विटरच्या अधिग्रहणाबाबत ते म्हणाले की, ट्विटरसाठी ते जास्त पैसे मोजत आहेत, पण दीर्घकालीन काळात सोशल मीडिया कंपनीत वाढीची भरपूर शक्यता आहे. टेस्लाच्या त्रैमासिक कमाईच्या कॉलच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना मस्क म्हणाले होते की, ट्विटर गेल्या काही काळापासून खूप कमजोर झालं आहे. त्यामध्ये उत्तम क्षमता आहे मात्र त्या पुढे येण्यासाठी वेळ लागू शकतो.