JOIN US
मराठी बातम्या / मनी / आर्थिक फटका सहन करण्यासाठी तयार राहा! पेट्रोल 5 रुपये प्रति लीटरने महागणार- रिपोर्ट

आर्थिक फटका सहन करण्यासाठी तयार राहा! पेट्रोल 5 रुपये प्रति लीटरने महागणार- रिपोर्ट

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेले तीन दिवस सलग इंधनाचे भाव वाढले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 मे: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेले तीन दिवस सलग इंधनाचे भाव वाढले आहेत. या वाढीनंतर देशातील अनेक भागात पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लीटरच्या जवळपास पोहोचले आहेत. सामान्यांना हा भार सहन करावा लागतोच आहे, तोवर आणखी धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की येणाऱ्या काळात पेट्रोलचे दर 5 रुपये प्रति लीटरने वाढण्याची शक्यता आहे. काय आहे अहवाल? क्रेडिट सुईस (Credit Suisse) च्या अहवालात अशाप्रकारे इंधन दरवाढीचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की, तर तेल कंपन्यांनी मार्जिन सुधारण्याचा अर्थात त्यांचं होणारं नुकसान दूर करण्याचा प्रयत्न केला तर पेट्रोलचे दर 5.5 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 3 रुपये प्रति लीटरने वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे आता कंपन्या त्यांचे मार्केटिंग मार्जिन सुधारण्याचा प्रयत्न करतील. हे वाचा- खोळंबा टाळण्यासाठी आज पूर्ण करा Banking संबंधित काम, उद्यापासून 3 दिवस बँका बंद जर तेल मार्केटिंग कंपन्या त्यांचे मार्जिन आर्थिक वर्ष 2019-20 च्या स्तरावर ठेवू इच्छितात तर त्यांना डिझेलच्या किरकोळ किंमतीत 2.8 ते 3 रुपये प्रति लीटर तर पेट्रोलची किंमत 5.5 रुपये प्रति लीटरने वाढेल, असा दावा या अहवालात केला आहे. गेले तीन दिवस वाढतातयंत इंधनाचे दर गेले तीन दिवस सतत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. परिणामी तीन दिवसांच्या वाढीनंतर पेट्रोल 60 पैशांनी महागलं आहे. मंगळवारी पेट्रोलचे दर 15 पैशांनी, बुधवारी 19 पैशांनी तर आज 25 पैशांनी वधारले आहेत. तर डिझेलच्या दरात गेल्या तीन दिवसात 69 पैशांनी वाढ झाली आहे. देशातील मुख्य शहरातील इंधनाचे आजचे दर » दिल्लीमध्ये पेट्रोल 90.99 रुपये आणि डिझेल 81.42 रुपये प्रति लीटर » मुंबईमध्ये पेट्रोल 97.34 रुपये आणि डिझेल 88.49 रुपये प्रति लीटर हे वाचा- या सरकारी बँकेत तुमचं खातं आहे का? या चुकीमुळे होईल तुमचं अकाउंट रिकामं! » चेन्नईमध्ये पेट्रोल 92.90 रुपये आणि डिझेल 86.35 रुपये प्रति लीटर » कोलकातामध्ये पेट्रोल 90.14 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लीटर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या