जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Holiday: खोळंबा टाळण्यासाठी आज पूर्ण करा Banking संबंधित काम, उद्यापासून 3 दिवस बँका बंद

Bank Holiday: खोळंबा टाळण्यासाठी आज पूर्ण करा Banking संबंधित काम, उद्यापासून 3 दिवस बँका बंद

State Bank Of India कस्टमर कॉनटॅक्टलेस सर्वीस

State Bank Of India कस्टमर कॉनटॅक्टलेस सर्वीस

तुम्हाला बँकेशी संबंधित (Banking) काही कामं बँक शाखेत जाऊन करायची असल्यास ती आजच करून घेणे सोईचे ठरणार आहे. कारण, उद्यापासून बँकांना सलग 3 दिवस सुट्ट्या असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 मे : कोरोना परिस्थितीमुळे (Corona in India) घराबाहेर पडणे सध्या मुश्कील झाले आहे. मात्र, तुम्हाला बँकेशी संबंधित (Banking) काही कामं बँक शाखेत जाऊन करायची असल्यास ती आजच करून घेणे सोईचे ठरणार आहे. कारण, उद्यापासून बँकांना सलग 3 दिवस सुट्ट्या असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. भारतीय रिझर्व बँक (RBI) वर्षभरातील सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. यामध्ये सर्व बँकांच्या सुट्या राज्यानुसार दिल्या जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार साप्ताहिक सुटी, राष्ट्रीय सुटी यासह मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. विविध राज्यांनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. कोणत्या दिवशी आणि बँका कशासाठी बंद असतील (मे 2021 मधील बँक सुट्टीची यादी) > >7  मे: शुक्रवार - जमात-उल-विदा (जम्मू आणि श्रीनगरमध्ये जमात-उल-विदामुळे बँका उघडणार नाहीत) » 8 मे: शनिवार - आठवड्याची सुट्टी » 9 मे: रविवार - आठवड्याची सुट्टी 1 मे रोजीही बँका होत्या बंद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार 1 मे रोजी बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि महाराष्ट्रामध्ये कामगार दिन असल्यामुळे बँका बंद होत्या. परंतु, लखनऊ, नवी दिल्लीसारख्या शहरांमध्ये या दिवशी बँका नियमित वेळेत कार्यरत होत्या. याशिवाय 1 मे ला लागूनच 2 मे रोजी देशातील सर्व बँका आठवड्याच्या सुट्टीमुळे बंद होत्या. हे वाचा- कोरोना काळात मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी मे महिन्यात पुढील दिवस अशा आहेत सुट्ट्या >> 13 मे: गुरुवार - (श्रीनगर, जम्मू, नागपूर आणि कानपूरमधील बँका ईदच्या उत्सवामुळे बंदच राहतील.) » 14 मे: शुक्रवार - परशुराम जयंती / ईद / अक्षय तृतीया (जम्मू, मुंबई, नागपूर येथे या दिवशी बँका खुल्या असतील.) » 16 मे: रविवार - आठवड्याची सुट्टी » 22 मे: शनिवार - आठवड्याची सुट्टी » 23 मे: रविवार - आठवड्याची सुट्टी » 26 मे: गुरुवार - बुद्ध पोर्णिमा »30 मे: रविवार - आठवड्याची सुट्टी हे वाचा -  Coronavirus 2nd Wave: हा आठवडा सांभाळा! सर्वोच्च आकडेवारीचा ‘हाय अलर्ट’, नंतर अशी कमी होणार रुग्णसंख्या दरम्यान, या महिन्यात कोरोनाची दुसरी लाटही जोमात असणार आहे. त्यामुळे कोणत्याही कामासाठी बँकामध्ये जाताना कोरोनाविषयीची सर्व खबरदारी घेणे गरजेचे आहे. मे महिन्यानंतर कोरोना लाट कमी होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा आठवडा खूप काळजी घेण्याची गरज आहे. मे महिन्याच्या अखेरीस कोरोना लाट ओसरू लागण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात