मुंबई, 20 जानेवारी: UPI नोंदणीसाठी तुमच्याकडे डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. डेबिट कार्डद्वारे OTP ऑथेंटिकेशन केल्यानंतरच तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. पण आता तुम्ही डेबिट कार्ड (ATM) शिवायही UPI वापरू शकता. ऑनलाइन पेमेंट अॅप PhonePe ने आधार कार्डसह UPI नोंदणीची सुविधा देऊन ही प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. आता PhonePe अॅपवरील नवीन यूझर्स आधार कार्ड आणि OTP पडताळणीद्वारे UPI अॅक्टिवेट करू शकतात. कारण तुमचे बँक खातेही आधार कार्डशी जोडलेले आहे. आता ज्या युजर्सकडे डेबिट कार्ड (ATM) नाही ते देखील UPI द्वारे पेमेंट करु शकतात. आज आपण डेबिट कार्डशिवाय UPI साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे ते जाणून घेणार आहोत. गाडीचा इंश्युरन्स काढण्याआधी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
UPI म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आहे. ही एक रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे जी मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे दोन बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करण्यात मदत करते. UPI द्वारे तुम्ही एकाच मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे अनेक बँक खात्यांना अॅक्सेस करू शकता. हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने तयार केले आहे, ज्याची देखरेख रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते.
PhonePe अॅपवर आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशन करण्यासाठी सध्याच्या UPI यूजर्सला त्यांच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 6 अंक टाकणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि तुमच्या बँकेकडून एक OTP मिळेल. अशा प्रकारे तुमचा UPI अॅक्टिवेट होईल. त्यानंतर तुम्ही PhonePe अॅप वापरणाऱ्या कोणालाही UPI वरून पैसे ट्रान्सफर करू शकाल. ‘या’ तारखेपूर्वी लिंक करुन घ्या Aadhaar-Pan, अन्यथा भरता येणार नाही टॅक्स; जाणून घ्या सोपी पद्धत
-सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर Phone Pe अॅप इन्स्टॉल करा. -अॅप ओपन केल्यावर तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि OTP टाकावा लागेल. -यानंतर My Money वर जा आणि Payment Methods वर क्लिक करा. -त्यानंतर ‘नवीन बँक खाते जोडा’ वर क्लिक करा आणि ज्या बँकेत तुमचे खाते आहे ती बँक निवडा. -येथे तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जाईल. -आता तुम्हाला तुमचा UPI पिन कॉन्फिगर करण्यासाठी दोन पर्याय मिळतील. -येथे तुम्ही डेबिट/एटीएम कार्ड किंवा आधार कार्ड निवडू शकता. -येथे आधार नंबरचे शेवटचे सहा अंक टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल. -तुम्ही OTP टाकताच तुमचा UPI पिन अॅक्टिव्ह होईल. आता तुम्ही त्याच्या सर्व वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता.