नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) च्या किंमतीत सातत्याने वाढ पाहायला मिळते आहे. म्हाला एलपीजी सबसिडी (LPG Subsidy)अंतर्गत मोठा दिलासा मिळू शकतो. एलपीजी सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात. याआधी तुम्ही एलपीजी सबसिडीचे लाभार्थी आहात की नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे. तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे तपासा. तुमच्या खात्यात पैसे येत आहेत की नाही हे पाहणं आवश्यक आहे. जर हे पैसे येत नसतील तर तुमचं बँक खातं त्वरित आधारशी लिंक करा. लिंक केल्यानंतर पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये येतील. सबसिडी न मिळण्याचं महत्त्वाचं कारण सबसिडी न मिळण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की एलपीजी आयडी तुमच्या अकाउंटशी जोडलेला असत नाही. याकरता तुम्हाला तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क करा आणि त्यांना या समस्येविषयी सांगा. तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर देखील कॉल करू तक्रार करू शकता. प्रत्येक राज्यात एलपीजी सबसिडी वेगवेगळी निश्चित आहे. ज्या लोकांचे उत्पन्न वार्षिक 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना सबसिडी दिली जात नाही. 10 लाखाचे हे उत्पन्न पती आणि पत्नी दोघांचे मिळून आहे. हे वाचा- 5 महिन्यातील निचांकी पातळीवर सोन्याचे दर, पण लवकरच गाठणार 50 हजारांचा टप्पा अशाप्रकारे करा चेक »सर्वात आधी www.mylpg.in वेबसाइटला भेट द्या »यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला तीन कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल. »यापैकी तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या फोटोवर क्लिक करा »यानंतर नवीन विंडो ओपन होईल, यामध्ये तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती असेल हे वाचा- PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील महिन्यापासून होणार हा बदल »याठिकाणी साइन इन किंवा न्यू युजरचा पर्याय निवडा »यानंतर आणखी एक नवीन विंडो ओपन होईल, याठिकाणी व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्रीचा पर्याय सिलेक्ट करा »याठिकाणी तुम्हाला कळेल की तुम्हाला सबसिडी मिळते आहे की नाही. जर मिळत नसेल तर तुम्ही 18002333555 टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकता.