JOIN US
मराठी बातम्या / मनी / सोनंखरेदीसाठी कमी पडतायंत पैसे? आवडीचे दागिने खरेदी करा EMI वर; वाचा सविस्तर

सोनंखरेदीसाठी कमी पडतायंत पैसे? आवडीचे दागिने खरेदी करा EMI वर; वाचा सविस्तर

भारत असा देश आहे जिथे सोन्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर सोन्याच्या दागिन्यांना पारंपरिक महत्त्वही आहे. मात्र गेल्या काही काळापासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 जुलै: भारत असा देश आहे जिथे सोन्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर सोन्याच्या दागिन्यांना पारंपरिक महत्त्वही आहे. मात्र गेल्या काही काळापासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी EMI वर सोनंखरेदीचा पर्याय उत्तम ठरू शकतो. तुम्हाला एखादा दागिना आवडला असेल पण पैसे कमी पडत असतील तर AUGMONT तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. दरम्यान EMI वर ज्वेलरी कशी खरेदी करायची, याकरता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील का, ज्वेलरीची डिलिव्हरी कशी होईल इ. प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत. EMI वर खरेदी करा ज्वेलरी Augmont तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे. याकरता तुम्हाला सुरुवातीला 20% डाउन पेमेंट करावे लागेल. 20 टक्के पेमेंटनंतर तुमचा EMI किती होईल ते निश्चित केले जाईल. कॉस्ट ईएमआय पेमेंटच्या 10 दिवसात डिलिव्हरी केली जाईल. कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी अशाप्रकारे EMI वर दागिने खरेदी करणं एक चांगला पर्याय ठरू शकतो. याकरता ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. हे वाचा- पुन्हा 47 हजारांच्या जवळपास पोहोचलं सोनं, चांदीही 1200 रुपयांनी महागली कुठे आणि कशाप्रकारे कराल खरेदी? Augmont च्या वेबसाइटवरुन ऑनलाइन शॉपिंग करता येईल. तर Augmont च्या चॅनल पार्टनर शॉपवर देखील ज्वेलरीची खरेदी करता येईल. 20 टक्के डाउनपेमेंटनंतर EMI फिक्स केला जाईल. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की किती EMI भरावा लागेल. शिवाय सोन्याचे दर वाढले तरी तुमच्या EMI मध्ये काही बदल होणार नाही. ग्राहक दागिन्यांचा पूर्ण सेट अशाप्रकारे हप्त्यांमध्ये खरेदी करू शकता. हे वाचा- दररोज 130 रुपयांची बचत करुन मुलीच्या लग्नासाठी मिळवा 27 लाख, काय आहे LIC योजना डिस्ट्रिब्युशनचे मॅकेनिझम सिक्योअर्ड कुरिअरच्या माध्यमातून ज्वेलरीची डिलिव्हरी केली जाते. चॅनल पार्टनर शॉपवर देखील डिलिव्हरी शक्य आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टिअर-2, टिअर-3, टिअर-4 शहरात अशाप्रकारे मागणी जास्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या