मुंबई, 17 जानेवारी: येत्या 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना अनेक भेटी मिळू शकतात. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार बजेटच्या बैठकांमध्ये मध्यमवर्गीयांना खूश करण्यावर जास्त जोर दिला जात असल्याची माहिती आहे. टॅक्स च्या दरांमध्ये कपात केली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मध्यमवर्गीयांना अनेक गोष्टींमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी विविध पर्याय वापरले जाणार असल्याची माहिती आहे. बजेटमध्ये कोणकोणत्या घोषणा होऊ शकतात याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया…
गेल्या 8 वर्षात महागाई खूप वाढली आहे. विशेषत: कोरोनानंतर मध्यमवर्गीय आणि पगारदार वर्गाच्या उत्पन्नावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करू शकते, अशी आशा लोकांना वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आयकर प्रणालीमध्ये कर दरांमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच नवा आयकर जुन्या आयकराच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोग येणार?
आरबीआयने गेल्या काही महिन्यांत रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे, त्यामुळे गृहकर्ज महाग झाले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि नोकरदार लोकांना बसला आहे. यामुळेच घर खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी सरकार बजेटमध्ये गृहकर्जाशी संबंधित दिलासा वाढवण्याचा विचार करू शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच विधान केले होते की, त्या स्वत: मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्या आहेत आणि त्यांना मध्यमवर्गीयांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजतात. 2023च्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांना मिळू शकतो दिलासा
रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार या बजेटमध्ये अनेक घोषणा करू शकते. सरकार सेक्टर किंवा कंपन्यांसाठी अशा सवलती जाहीर करू शकते, ज्यामुळे नवीन नोकऱ्यांची संख्या वाढेल.