आता घरबसल्या KYC अपडेट
नवी दिल्ली, 02 मे: गेल्या काही वर्षात बँकांतील फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) च्या व्याज दरात मोठी घसरण झाली आहे. अशातच इंडसइंड (IndusInd Bank) या खासगी बँकेने नुकतंच फिक्स्ड डिपॉझिटवर त्यांच्या व्याज दरात (Interest rate) बदल केलाय. या बँकेचे नवे व्याज दर 26 एप्रिलपासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेच्या ग्राहकांना आता 7 ते 30 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.75% व्याज मिळेल. तसेच 31 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3% आणि 46 ते 60 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.50% आणि 61 ते 90 दिवसांच्या मुदतीसाठी 3.75% व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज 91 ते 120 दिवस मुदतीच्या ठेवीवर 4 टक्के, 121 ते 180 दिवसांवर 4.5 टक्के आणि 181 ते 210 दिवसांच्या ठेवीवर 5 टक्के व्याज मिळेल. तसेच 211 ते 269 दिवसांच्या मुदतीच्या ठेवीवर 5.25 टक्के आणि 270 दिवस किंवा एका वर्षापेक्षा कमी काळात मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर 6 टक्के व्याज मिळणार आहे. इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज देते, ते पुढेही चालूच राहणार असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलंय. (हे वाचा- कोण होणार एअर इंडियाचा नवा मालक! टाटा आणि स्पाईसजेटमध्ये शर्यत, किती लावली बोली? ) इंडसइंड बँकेचा नफा दुपटीने वाढून 876 कोटींवर इंडसइंड बँकेने शुक्रवारी सांगितलं, की मार्च 2021 मध्ये संपलेल्या 2020-21 या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत त्यांचा नफा दुपटीने वाढून 876 कोटी रुपये झाला आहे. तसेच 2019-20 च्या शेवटच्या तिमाहीत त्यांना 301.84 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. (हे वाचा- SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! तुमच्या गृहकर्जावरील EMI झाला कमी ) बँकेने शेअर बाजारला सांगितलं की बँकेच्या निरीक्षणाच्या कालावधीत त्यांच्या एकूण उत्पन्नात थोडी वाढ होऊन ते 9,199.48 कोटी रुपयांवर पोहोचले. जे गेल्या वर्षी याच कालावधीत 9,158.57 कोटी रुपये होतं. 2020-21 या वित्त वर्षात त्यांचा निव्वळ नफा 36 टक्क्यांनी कमी होऊन 2,836.39 कोटी रुपये झाला होता. हाच नफा गेल्या वर्षी 4,417.91 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात बँकेचं उत्पन्न 35,558.41 कोटी रुपये होतं. बँकेचे एनपीए (NPA) मार्च 2020 मध्ये 2.45 टक्के होते ते किरकोळ वाढीसह 31 मार्च 2021 रोजी 2.67 टक्क्यांवर पोहोचले.