नवी दिल्ली, 11 मे: जर तुमचं बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या बँकेत खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बँकेकडून ग्राहकांसाठी काही आवश्यक आणि खास क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्याकडे हे क्रमांक सेव्ह असणं आवश्यक आहे. या क्रमांकांच्या माध्यमातून तुम्हाला विविध बँकिंग सेवा दिल्या जाणार आहेत. BoB ने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. कोणते आहेत हे क्रमांक? 1. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी- 8468001111 2. खात्यामार्फत झालेले शेवटचे पाच व्यवहार (Last 5 Transaction) जाणून घेण्यासाठी-8468001122 3. टोल फ्री नंबर - 18002584455 / 18001024455 4. बँकेच्या WhatsApp सेवेसाठी- 8433888777
WhatsApp वर कोणत्या सेवा मिळतील? -शिल्लक रक्कम जाणून घेणे -डेबिट कार्ड ब्लॉक करणे -मिनि स्टेटमेंट -बँकिग प्रोडक्टबद्दल माहिती -चेक बुकसाठी रिक्वेस्ट -व्याज दर आणि सेवा -चेक स्थिती -अन्य सेवा (हे वाचा- खात्यासाठी निवडा तुमचा Lucky Number! ही बँक देतेय खास सुविधा ) कशाप्रकारे कराल व्हॉट्सअॅप बँकिंगचा वापर? सर्वप्रथम तुम्हाला बँकेचा WhatsApp क्रमांक 8433888777 सेव्ह करावा लागेल. तुम्ही https://wa.me/918433888777?text= या लिंकवर Hi असा मेसेज करून देखील हे काम करू शकता. या माध्यमातून तुम्ही काही ठराविक कामं करू शकता. शिल्लक रक्कम जाणून घेणे, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, चेक बुकसाठी अप्लाय आणि वरती दिल्याप्रमाणे काही ठराविक कामं या माध्यमातून करता येतात. शिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेबाबत देखील माहिती मिळवू शकता. हे वाचा- तुमचं SBI सॅलरी अकाउंट आहे का? स्वस्त लोन आणि लॉकरसह मिळतील हे 5 मोठे फायदे ) अलीकडेच लाँच केलं हे App बँक ऑफ बरोडाने अलीकडेच Baroda M Connect Plus हे अॅप लाँच केलं आहे. लोकांना सेल्फ सर्व्हिस मिळू शकेल आणि चोवीस तास बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही डिजिटल शाखा सुरू केली गेली आहे. ज्यांना तांत्रिक ज्ञान आहे, त्यांना ही सेवा अधिक योग्यरित्या वापरता येईल.