JOIN US
मराठी बातम्या / मनी / कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांना मिळू शकतं पेन्शन, जाणून घ्या EPFO चा नियम

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांना मिळू शकतं पेन्शन, जाणून घ्या EPFO चा नियम

पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला 10 वर्ष सलग नोकरी करणं गरजेचं आहे. या पेन्शन स्कीममध्ये कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के जमा होतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जुलै: नोकरदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही भाग EPFO कडून PF आणि पेन्शन स्कीम (EPS) मध्ये जमा होतो. यामुळे कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करता येतं. या EPS पेन्शन स्कीम अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तरीही पेन्शन बंद होत नाही. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळतो. कर्मचाऱ्याच्या मुलांना आणि पत्नीला या पेन्शनचा फायदा मिळतो. तुमच्या पगारातून PF स्वरुपात कापली जाणारी रक्कम दोन प्रकारात विभागली जाते. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे प्रोव्हिडेंट फंड (Provident Fund) अर्थात ईपीएफ (EPF) आणि दुसरा प्रकार म्हणजे पेन्शन फंड (Pension Fund) अर्थात ईपीएस (EPS). या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला 10 वर्ष सलग नोकरी करणं गरजेचं आहे. या पेन्शन स्कीममध्ये कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के जमा होतात. EPFO नियमानुसार, रिटारयमेंटशिवाय कर्मचाऱ्याला एखाद्या दुर्घटनेत अपंगत्व आल्यासही पेन्शन मिळू शकतं. Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती - EPS स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्याला तो जीवित असेपर्यंत दर महिन्याला पेन्शन मिळतं. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पती किंवा पत्नीला पेन्शन मिळतं. - कर्मचाऱ्यांच्या 2 मुलांना त्यांच्या 25 वर्षापर्यंत पेन्शन मिळेल. - कर्मचारी अविवाहित असल्यास त्याच्या नॉमिनीला पेन्शन मिळतं. - अविवाहित असल्यास किंवा नॉमिनी नसल्यास, कर्मचाऱ्याचा मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना पेन्शन मिळतं. पुढील वर्षात या कर्मचाऱ्यांना पगारवाढीची शक्यता, पाहा किती मिळणार वाढ दरम्यान, तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल तर SMS द्वारे पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणं आवश्यक आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं टाईप करावी लागतील. तसंच, तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन 011-22901406 या नंबरवर एका मिस कॉलद्वारे PF Balance ची माहिती मिळेल. यानंतर पीएफचे डिटेल्स तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे मिळतील. त्याशिवाय Epfindia.gov.in वर लॉगइन passbook.epfindia.gov.in यावर आवश्यक डिटेल्स भरुन पीएफ बॅलेन्स समजू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या