• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: पहिल्या T20 मध्ये कोण खेळणार? शिखर धवननं दिले संकेत

IND vs SL: पहिल्या T20 मध्ये कोण खेळणार? शिखर धवननं दिले संकेत

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिला टी20 सामना रविवारी होत आहे. या मॅचमध्ये कुणाला खेळवणार याचे संकेत कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) दिले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 25 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिला टी20 सामना रविवारी होत आहे. यापूर्वी झालेली वन-डे मालिका टीम इंडियानं 2-1 या फरकानं जिंकली. टीम इंडियानं तिसऱ्या वन-डे सामन्यात पाच जणांना पदार्पण करण्याची संधी दिली. 1980 नंतर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा ही घटना घडली आहे. आता टी20 मालिकेत टीम मॅनेजमेंट नवोदीत खेळाडूंनाच संधी देणार की अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देणार? ही चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) याने या चर्चेला उत्तर दिलं आहे. शिखर धवननं पहिल्या मॅचपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'नव्या खेळाडूंना नक्की संधी मिळेल. मालिका जिंकण्याचे आमचे मुख्य ध्येय आहे. शेवटच्या वन-डेमध्ये तरुण खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली याचे कारण म्हणजे आम्ही मालिका त्यापूर्वीच जिंकली होती. आता ही नवी मालिका आहे. या मालिकेत आम्ही सर्वोत्तम प्लेईंग 11 (Playing XI) सह उतरणार आहोत. आम्ही पहिल्या दोन मॅच जिंकण्याचा प्रयत्न करु. त्यानंतर गरज पडली तर परिस्थितीनुसार शेवटच्या मॅचमध्ये प्रयोग करु शकतो.' असे धवनने स्पष्ट केले. धवन यावेळी बोलताना म्हणाला की, ' सर्व तरुण खेळाडू तयार आहेत. त्यामुळेच त्यांना टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. वन-डे मालिकेत त्यांनी चांगला खेळ केला. आम्ही टी20 मालिकेत देखील आत्मविश्वासानं उतरणार आहोत. आमच्या टीममध्ये चांगलं वातावरण आहे. सर्व खेळाडू उत्तर प्रदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत.' ऑलिम्पिकमध्ये वाद, भारतीय खेळाडूनं कोचचा सल्ला नाकारला! टी20 वर्ल्ड कपबद्दल म्हणाला... शिखर धवनला टी20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. धवननं त्या विषयावर देखील मत व्यक्त केले. 'मी स्वत: या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत चांगला खेळ खेळून वर्ल्ड कपसाठी टीममधील जागा निश्चित करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यानंतर काय होते ते पाहूया,' असे धवनने सांगितले.
  Published by:News18 Desk
  First published: