JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोनंचांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव, आजही दरात घसरण

Gold Price Today: सोनंचांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव, आजही दरात घसरण

Gold Price Today: अक्षय तृतीया अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढत असल्याने सोन्याचे दर आज काहीसे उतरले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आधी इथे लेटेस्ट दर तपासून घ्या

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 मे: अक्षय तृतीयेदिवशी (Akshay Tritiya 2021) सोन्याची खरेदी करणं अनेकजण शुभ मानतात. शिवाय अनेक राज्यात लॉकडाऊन जरी असला तरी छोटेखानी लग्नसमारंभ तर पार पडतं आहेत, अशावेळी सोनेखरेदी केली जाते. काही ठिकाणी ऑनलाइन सोनं खरेदीला देखील पसंती दिली जाते. दरम्यान यामुळे आता पुन्हा एकदा सोन्याची मागणी वाढू लागली आहे.  त्यामुळे तुम्ही देखील सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आधी इथे लेटेस्ट दर तपासून घ्या. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते सोन्याच्या किंमती (Gold Price Today) प्रति तोळामागे 44,710 रुपये आहेत. ही किंमत 22 कॅरेट ची आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 45,710 रुपये प्रति तोळा आहे. विविध शहरात सोन्याची किंमत वेगवेगळी असते. दरम्यान चांदीबाबत बोलायचे झाले तर आज चांदीचे दरही 370 रुपयांनी कमी झाले आहेत. 1 किलो चांदीची किंमत (Silver Price Today) 71,130 रुपये आहे. जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या शहरातील मौल्यवान धातूंचे दर. हे वाचा- सुवर्णसंधी! अक्षय तृतीयेला घरबसल्या खरेदी करा स्वस्त सोनं, तपासा काय आहेत ऑफर्स 22 कॅरेट सोन्याचे दर (Gold Price Today, 13 May 2021) दिल्लीमध्ये दर 45,900 रुपये प्रति तोळा आहे मुंबईमध्ये दर 44,720 रुपये प्रति तोळा आहे चेन्नईमध्ये दर 45,000 रुपये तोळा आहे कोलकातामध्ये दर 45,800 रुपये प्रति तोळा आहे 24 कॅरेट सोन्याची किंमत दिल्लीमध्ये दर 49,900 रुपये प्रति तोळा आहे मुंबईमध्ये दर 45,720 रुपये प्रति तोळा आहे चेन्नईमध्ये दर 49,090 रुपये तोळा आहे कोलकातामध्ये दर 49,560 रुपये प्रति तोळा आहे हे वाचा- कौतुकास्पद! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी बजाजचा हा निर्णय चांदीचे आजचे दर  (Silver Price Today, 13 May 2021) दिल्लीमध्ये दर 71,130 रुपये किलोग्रॅम तोळा आहे मुंबईमध्ये दर 71,130 रुपये किलोग्रॅम तोळा आहे चेन्नईमध्ये दर 76,000 रुपये किलोग्रॅम आहे कोलकातामध्ये दर 71,130 रुपये प्रति किलोग्रॅम आहे अक्षय तृतीयेदिवशी मिळतील ऑनलाइन खरेदीवर ऑफर टाटा ग्रुपच्या प्रसिद्ध तनिष्क या ज्वेलरी ब्रँडकडून तुम्ही ऑनलाइन दागिने खरेदी करू शकता. यावेळी अक्षय तृतीयेला तुम्हाला सोनं आणि डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर (Making Charges) 25 टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही www.tanishq.co.in या वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय आणखी एक मोठं ज्वेलर्समधील नाव म्हणडे कल्याण ज्लेलर्स. त्यांच्या वेबसाइटवर तुम्ही सोनेखरेदी करू शकता. अक्षय तृतीयेनिमित्त कल्याण ज्वेलर्स 15 हजारांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने खरेदी केल्यानंतर आणि बँक कार्ड्सद्वारे पेमेंट केल्यानंतर 5 टक्के सूट देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या