JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आता महाराष्ट्रात, या हिलस्टेशनवर पडला तुफान पाऊस

जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आता महाराष्ट्रात, या हिलस्टेशनवर पडला तुफान पाऊस

जगात सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून मेघालयातलं मौसिनराम आणि त्याआधी चेरापुंजी हे आपण भूगोलात शिकलो. पण आता जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण मेघातलयातून महाराष्ट्र आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 सप्टेंबर : जगात सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून मेघालयातलं मौसिनराम आणि त्याआधी चेरापुंजी हे आपण भूगोलात शिकलो. पण आता जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण मेघातलयातून महाराष्ट्र आलं आहे. महाबळेश्वरला या वर्षी पडलेल्या पावसाचे आकडे ऐकलेत तर थक्क व्हाल. सातारा जिल्ह्यातल्या या हिलस्टेशनला यंदा पावसाने इतकं झोडपलंय की सगळे विक्रम मोडून काढले आहेत. या वर्षी जूनपासून 6 सप्टेंबरपर्यंत महाबळेश्वरला 7200 मिमी पाऊस झाला आहे. मौसिनरामला जून ते ऑगस्ट या पहिल्या तीन महिन्यातच साधारण 8000 मिमी च्या वर पाऊस पडतो. पण गेली दोन वर्षं हे प्रमाण खूप कमी झालंय आणि उलट महाबळेश्वरचा पाऊस मात्र वाढला आहे. या वर्षी मेघातलायतल्या चेरापुंजीला 6100मिमी आणि मौसिनरामला 6218 मिमी पाऊस झाला आहे. या मानाने महाबळेश्वरला झालेला पाऊस खूप जास्त आहे. यावर्षी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या जोडीला अरबी समुद्रावरून आलेले बाष्पयुक्त वारे घाटमाथ्यावर धुवांधार पाऊस पडायला कारणीभूत ठरले, असं हवामानतज्ज्ञ सांगतात. VIDEO: कोल्हापुरात पावसाचं थैमान; जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली त्यामुळे महाबळेश्वरसारख्या घाटमाथ्यावरच्या गावात प्रचंड पाऊस झाला. समोरचं दिसत नाही, इतका धो धो पाऊस महाबळेश्वरला अनुभवायला मिळाला. VIDEO: गडचिरोली पाण्याखाली; काळजात धडकी भरवणारी पुराची विदारक दृश्यं गेल्या वर्षीसुद्धा महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. ग्लोबल वॉर्मिंचा हा परिणाम असू शकतो, असं टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. ईशान्य भारतातला पाऊस कमी होऊन पश्चिम घाटात ठराविक ठिकाणी धुवांधार पाऊस पडण्याची घटना मान्सून पॅटर्न बदलतोय याचं लक्षण आहे. ————————————————- कोल्हापूर महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या