महेश तिवारी (प्रतिनिधी)गडचिरोली, 08 सप्टेंबर: गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून वीस मार्ग बंद आहेत. जवळपास तीनशे गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडची पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. हेलिकॉप्टरने जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागडच्या पुरपरिस्थितीची पाहणी केली. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पाण्याने चारी बाजुने भामरागडला वेढा दिल्यानं सहाशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.