JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: वर्धा रेल्वे स्टेशन होणार चकाचक, 150 कोटींमध्ये मिळणार 'या' सुविधा

Wardha News: वर्धा रेल्वे स्टेशन होणार चकाचक, 150 कोटींमध्ये मिळणार 'या' सुविधा

वर्धा रेल्वे स्टेशनचे 150 कोटींच्या निधीतून पुनरुज्जीवन होणार आहे. प्रवाशांना स्वयंचलित लिफ्टसह जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 24 फेब्रुवारी: वर्धा रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी स्वयंचलित लिफ्ट बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवास करणे सोपे होणार आहे. नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी वर्धा रेल्वे स्थानक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी तसेच प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

वर्धा रेल्वे स्थानक गती शक्ती प्रकल्पात नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि पथकाने वर्धा रेल्वे स्थानकाची अचानक पाहणी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत वर्धा रेल्वे स्थानकाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारच्या गती शक्ती प्रकल्पात वर्धा रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम निश्चित करण्यात आले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी स्थानक परिसराचा आढावा घेऊन पुनर्विकासासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत गतिशक्तीचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक हरी सिंह, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले, वरिष्ठ विभागीय अभियंता (केंद्रीय) हे उपस्थित होते. थेट प्लॅटफॉर्म प्रवेश वर्धा रेल्वे स्थानकावर प्रवाशांना फलाट क्रमांक २ आणि ३ वर जाण्यासाठी आधी चढावे लागते. आता थेट फलाटावर जाण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे तिकीट कार्यालयाजवळ नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. जे डाउन गेजसाठी असेल. यासोबतच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी यवतमाळ मार्गावरील दूरच्या तिकीट घराच्या बाजूला फलाट असेल. जेथे अप ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. Nashik News : शुद्ध हवा पाहिजे? तर रेल्वे स्टेशनवर चला! पाहा देशातील पहिला प्रयोग! काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी वर्धा रेल्वे स्थानकाचे सर्वेक्षण केले. यामध्ये वर्धा रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाबाबत चर्चा होत आहे. त्यामुळे लवकरच यावर काम सुरू होणार आहे. एस. के. झा, सचिव राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियन मंडळ, वर्धा यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या