JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: बेरोजगार हातांना मिळणार 'हवं ते काम', 8 लाखांहून जास्त तरुणांचा फायदा!

Wardha News: बेरोजगार हातांना मिळणार 'हवं ते काम', 8 लाखांहून जास्त तरुणांचा फायदा!

आता ग्रामीण रोजगार हमी योजनेत गावात किंवा गावाजवळच काम मिळणार आहे. त्यामुळे मजुरांची कामासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 20 फेब्रुवारी: गेल्या कित्येक दिवसांपासून बेरोजगारांच्या हाताला काम देणाऱ्या ग्रामीण रोजगार हमी योजनेत आता नोकरी मिळणार आहे. सरकारने या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मागेल त्याला काम देण्यासोबतच या योजनेत आता हवं ते काम मिळणार आहे. त्यामुळे गावातच किंवा गावाजवळील मजुरांना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील मजुरांची कामासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत एकूण 262 सार्वजनिक व वैयक्तिक कामे करण्यात आली आहेत. संबंधित योजनेंतर्गत काम मागणाऱ्या अकुशल कामगारांना नोकरी देण्याची तरतूद आहे. मजुरांना 100 दिवसांपर्यंत रोजगार मिळत आहे. 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. योजनेचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन केले जाते आणि वेतनाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते.

रोजगार हमी योजनेत आता ‘हवं ते काम’ मिळणार रोजगार हमी योजनेत सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. या योजनेतून आता तुम्हाला हवी ती नोकरी मिळेल. त्यामुळे प्रत्येक मजुराला त्यांच्या पद्धतीने काम मिळेल. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मजुरांना दररोज 265 रुपये दिले जातात. यामध्ये स्त्री व पुरुष असा भेद केला जात नाही. वर्धा जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत 38 हजार 249 मजुरांना काम देण्यात आले आहे. Wardha : मुलांच्या निरोगी आरोग्यसाठी प्रशासन कामाला, काय आहे नवं अभियान? वर्धा जिल्ह्यासाठी 8.56 लाख मजुरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट वर्धा जिल्हा प्रशासनाला 8.56 लाख मजुरांची नोंदणी करून त्यांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 48 हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. तर दहा महिन्यांत 38 हजारांहून अधिक मजुरांना काम देण्यात आले आहे. मजुरीचे पैसे त्वरित दिले जातात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत 38 हजारांहून अधिक मजुरांनी काम केले आहे. त्यापैकी 95 टक्के कामगारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळाला आहे. सर्वच मजुरांना त्यांच्या श्रमाचा मोबदला त्वरित मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या