JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईजवळच आहे जावायांचं गाव, अनेक घरांनी जपलीय ही परंपरा, पाहा Video

मुंबईजवळच आहे जावायांचं गाव, अनेक घरांनी जपलीय ही परंपरा, पाहा Video

मुंबईजवळच एक जावायांचं गाव आहे. या गावाला असं नाव का पडलं? यामागील परंपरा काय आहे याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 6 मे :   तुम्ही आजवर  बाबांच्या गावासंदर्भात ऐकलं असेल. आईच्या, मामाच्या किंवा अगदी आजी-आजोबांच्या गावासंदर्भातही ऐकलं असेल. पण जावायच्या गावाबद्दल ऐकलं आहे का? ठाणे जिल्ह्यातील एका गावाची जावायाचं गाव म्हणून ओळख आहे. कोणतं आहे हे गाव? याला जावायांचं गाव असं का म्हणतात? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काय आहे कारण? ठाणे जिल्ह्यातील वांगणी हे जावायांचं गाव म्हणून ओळखले जाते. ठाणे जिल्ह्याच्या एका टोकाला असलेलं हे निसर्गरम्य, शांत आणि छोटसं गाव आहे. या गावात वेगवेगळ्या समुहाचे लोकं एकत्र राहतात. वांगणीकरांच्या आपुलकीमुळेच या गावाला जावायांचं गाव अशी ओळख मिळाली आहे.

पूर्वी मुलींची लग्नं ही त्यांच्या गावापासून काही अंतरावर करून दिली जात. दळण वळणाची साधनेही कमी होती. काही गावांमध्ये पाण्याची टंचाई देखील भासत असे. त्या काळातही वांगणी हे सधन लोकवस्ती असणारे गाव ओळखले जात. या गावात बारमाही वाहणारी उल्हास नदी असल्याने गावाला पाणी टंचाईचा त्रास देखील नाही.  आपल्या मुलींना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या गावातील सासाऱ्यानी जावयांना आपल्या गावी येऊन राहण्याचे निमंत्रण दिले.  गावातील सोयी सुविधांचा विचार करून  जावई देखील या गावात स्थायिक झाले. हळू हळू जावयांची संख्या वाढत गेली आणि या गावाला जावयांचे गाव म्हणून ओळख मिळाली, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. प्रतिकचा नादखुळा, मुलींना सुद्धा लाजवेल केलं असं काम, आता देशभरातून डिमांड ‘वांगणीकरांचा स्वभाव हा अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू आहे.  सासऱ्यांकडून आमची मुलांप्रमाणे काळजी घेतली जाते. बऱ्याच घरात जावायांसोबत त्यांचे आई-वडीलही इथंच राहतात. त्यामुळे गावात आपुलकीचे बंध निर्माण झाले आहेत, अशी माहिती वांगणीत राहणाऱ्या जावायांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या