सचिन जिरे, (प्रतिनिधी) औरंगाबाद, 1 नोव्हेंबर: भाजप (BJP) हा एक परिवार आहे. भाजप जनतेचा पक्ष आहे. तर काँग्रेस (Congress) हा परिवाराचा पक्ष आहे, अशी बोचरी टीका टीका करीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb danve) यांनी गांधी परिवारावर हल्ला चढवला. सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी ( Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) हे काँग्रेसचं अध्यक्षपद नको असल्याचं एका बाजुला सांगतात, मात्र दुसऱ्या बाजुला मग नेत्यांना नोटिसा का देतात, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केली. काँग्रेसचं अध्यक्षपद हे गांधी परिवराकडेच ठेवायचा आहे, असा टोला रावसाहेब दानवे यांनी यांनी लगावला. **हेही वाचा..** फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय केराच्या टोपलीत, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा औरंगाबादेतील भारतीय युवा मोर्चाच्या नियुक्ती प्रदान कार्यक्रमात रावसाहेब दानवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार डॉ.भागवत कराड उपस्थित होतं. केंद्राचा कृषी विधेयक धोरण शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. कृषी विधेयकावरून आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पक्षाने यामध्ये कुठले कलम शेतकऱ्यांविरोधात आहे, हे दाखवून द्यावं. त्यासाठी कृषी विधेयकाची माहितीचे मराठीत अनुवाद करण्यात आला आहे. राज्यात फडणवीस सरकारमध्ये विकास झाला, तेवढा विकास महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत झालं नाही, असं विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं. औरंगाबाद मनपाला दिलेले 100 कोटी वेळीच खर्च केले असते तर अजून 150 कोटी रुपये फडणवीस सरकारने शहराला दिले असते. मात्र, 2019 पूर्वी मनपाला निधी खर्च करता आला नाही, असं सांगत हरिभाऊ बागडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. हेही वाचा.. सोलापुरातून मुंबईत आले लालपरीच्या सेवेला, पण उपचाराअभावी चालकाचा दुर्दैवी मृत्यू खासदरकीचा खेळ जमला नसता तर दातेही गेले असते… खासदार डॉ. भागवत कराड यांच्या डोक्यावरचे केस गेले आहेत. या वर्षी खासदरकीचा खेळ जमला नसता तर दातही गेले असते, असा मिश्किल टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला. मात्र, दानवेंच्या वक्तव्यानंतर एकच हश्या पिकला.