JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय - राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय - राऊत

‘शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी पाहण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं, पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून आता पाहतो आहे. आता फक्त राज्याचं नाही तर देशाचं नेतृत्व करायची वेळ आली आहे.’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून : शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचं शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी पाहण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं, पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून आता पाहतो आहे. आता फक्त राज्याचं नाही तर देशाचं नेतृत्व करायची वेळ आली आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशावर आलेल्या कोरोना आणि चीन या संकटांचा उल्लेख केला. पंतप्रधानांबरोबर चीनविषयी होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी शिवसैनिकांना दिली. “आपल्याबरोबर राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढण्यासाठी मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे”, असंही उद्धव म्हणाले. मराठमोळ्या अभिजीत बापट यांच्यामुळं अशी झाली 10 जवानांची सुटका पण उद्धव यांच्याआधी बोलायला उभे राहिलेल्या खासदार संजय राऊत यांनी मात्र दिल्लीतल्या सत्तेसाठी सूर आळवले. “आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे,” असं राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, म्हणून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करू शकला आहे. आता पूर्ण सत्ता हाती यायचं स्वप्न आहे. सेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच खरं स्वप्न पूर्ण होईल, असंही राऊत म्हणाले. संकलन -अरुंधती लॉकडाऊन आणखी वाढणार! लवकरच निर्णय, महापौर म्हणाले… जान है तो जहान है WHO ने दिली खूशखबर; या वर्षाअखेरपर्यंत तयार होणार कोरोनाची लस कोरोनानं केलं लखपती! क्वारंटाइनमध्ये TikTok व्हिडीओ बनवून ‘हा’ तरूण झाला स्टार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या