Home /News /national /

भारत-चीन संघर्ष : मराठमोळ्या अभिजीत बापट यांच्यामुळं अशी झाली 10 जवानांची सुटका

भारत-चीन संघर्ष : मराठमोळ्या अभिजीत बापट यांच्यामुळं अशी झाली 10 जवानांची सुटका

चिनी सैन्यानं 10 भारतीय जवानांना ओलीस ठेवले होते, ज्यात दोन मेजरचाही समावेश होता.

    लडाख, 19 जून : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षाचे पडसाद साऱ्या जगावर उमटले आहेत. दरम्यान, या संघर्षानंतर चिनी सैन्याने 10 भारतीय जवानांना ओलीस ठेवले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, चिनी सैन्यानं 10 भारतीय जवानांना ओलीस ठेवले होते, ज्यात दोन मेजरचाही समावेश होता. दरम्यान, अखेर तीन दिवसांच्या चर्चेनंतर या 10 जवानांना सोडण्यात आलं आहे. मात्र सैन्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नाही. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी या जवानांची सुटका झाली, ते भारतीय ताफ्यात परतले आहेत. दरम्यान अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाटाघाटीत सगळ्यात महत्त्वाची भुमिका बजावली ती मेजर जनरल अभिजीत बापट यांनी. या 10 जवानांच्या सुटकेसाठी तीन बैठका झाल्या. याचे नेतृत्व दोन्ही देशातील प्रमुख मेजर यांनी केले. तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या या चर्चेनंतर 10 सैनिकांना सोडण्यात आले. भारताकडून मेजर जनरल अभिजित बापट तर चीनकडून करु येथील प्रमुख लष्करी अधिकारी बैठकीसाठी आले होते. यांच्यात गुरुवारी तिसऱ्यांदा भेट झाली, त्यानंतर चीननं 10 जवानांना सोडण्याचे मान्य केले. वाचा-चिनी सैनिकांविरोधात मुंबईत तयार होतायेत भारतीय जवानांसाठी नवे सुरक्षाकवच ही बैठक भारत-चीन संघर्ष आणि विवादित सीमेबाबत सुरू असलेल्या वादाचा एक भाग होती. मेच्या सुरूवातीपासून आतापर्यंत भारत-चीन यांच्यातील लष्करी अधिकारी सात वेळा भेटले आहेत. सध्या या 10 जवानांची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी लष्कराने आपल्या निवेदनात जवानांना ओलीस ठेवण्यात आले आहे की नाही याबाबत कोणती माहिती देण्यात आली नव्हती. याआधी जुलै 1962 मध्ये चिनी सैन्यानं भारतीय सैनिकांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी गलवान खौऱ्यात झालेल्या संघर्षात 30 भारतीय सैनिक शहीद झाले होते आणि चिनी सैन्यानं डझनभर सैनिकांना ताब्यात घेतले. मात्र सर्व जवानांना सोडण्यात आले. वाचा-चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग 76 जवान जखमी चिनी सैन्याने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या 76 सैनिक जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले, त्यापैकी 18 गंभीर जखमी झाले, तर 58 मध्यम जखमी झाले. लेह रुग्णालयात 18 जवानांवर उपचार सुरू आहेत, तर 58 जवान अन्य विविध रुग्णालयात दाखल आहेत. वाचा-भारत चीन : दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची संघर्षानंतर प्रथमच फोनवर चर्चा संपादन-प्रियांका गावडे.
    First published:

    Tags: India china border, India-China

    पुढील बातम्या