'त्या' पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
रायगड, 6 मे : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाडमध्ये सभा घेत आपली भूमिका मांडली. सत्ताधारी शिवसेना-भाजपकडून ठाकरेंनीच बारसूत प्रकल्प यावा यासाठी पत्र दिल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. अखेर या पत्रावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझी दिशाभूल करण्यात आली : ठाकरे एक पत्र फडकवल जातं, उद्धव ठाकरेंनी दिलं. हो उद्धव ठाकरेंनी लिहिलच होतं पत्र, मी जाहिरपणे सांगतो. कारण मला खोट बोलता येत नाही, खोट बोलण्याची गरज नाही, कारण मी पाप केलेल नाही. मी मुख्यमंत्री असताना नाणारला रिफायनरी होऊ दिली नाही, नंतर मला दिल्लीहुन फोन आले, आता तिकडे गेलेले हे गद्दार माझ्याकडे आले, साहेब हा मोठा प्रकल्प आहे, मोठा आहे पण विनाशकारी असेल तर कोकणात का घेता? तर सांगितले, तिकडे कोणाचा विरोध नाही, वस्त्या नाहीत, गाव नाहीत, पर्यावरणाची हानी होणार नाही, ओसाड जमीन आहे, म्हणून माझ्याकडुन पत्र दिलं गेलं. आता मला अशी शंका येतेय, साधारण हा सिक्वेन्स पाहिलात तर आपलं सरकार पाडलं आणि तिकडून संमती आली किंवा कदाचित तिकडून संमती आली असेल आणि आपलं सरकार पाडल असेल, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे मैदान आता अपुरी पडत आहेत. बर्याच जणांना वाटत होत शिवसेना आता संपली. काहीजणांना माझ्यावर टीका केल्याविना जेवण मिळत नाही. काहीजणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय घास गिळत नाही. शिवसेना संपली पाहिजे हे काही लोकांच स्वप्न. भाजपने सर्वात मोठा नीच डाव खेळला. आपणच शिवसेना हा अनेकांना गैरसमज. आपल्या लोकांनी भाजपच्या मदतीने पाठीत वार केला. धनुष्यबाण चोरला, पक्षाच नाव चोरलं. महाविकास आघाडी म्हणून आपण पूढे जात आहोत. फटाके देखील शिवसैनिकांसारखे, एकदा पेटले की थांबत नाहीत. म्हणून शिवसैनिकांना कोणी पेटवु नये नाहीतर हे मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजल्याशिवाय राहणार नाहीत. वाचा - सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेंविरोधात गेला तर… पवारांनी सांगितलं पुढचं गणित निष्ठा कशाला म्हणतात? तानाजी मालुसरे तर रायबाच्या लग्नाच आमंत्रण घेऊन गेले होते आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहित आहे. याला म्हणतात निष्ठा, मेलो तरी बेहत्तर पण भगव्याशी बेईमानी करणार नाही, भगवा फडकवेन आणि त्या बहाद्दराने भगवा फडकवुनच प्राण सोडला. ही तानाजी आणि त्याचे वारसदार माझ्यासमोर बसले आहेत… अशी ही भूमी आहे. गद्दार नाचत आहेत उपर्यांच्या सुपार्या घेऊन, कारण जागा विकल्यात, मलिदा खाल्लाय. यादी काढलीत तर त्यात उपर्यांची धन झालेली आहे. माझे गोरगरीब जे मुळ जमीन मालक आहेत त्यांना मधाच बोट लावुन तुम्हीं सोन्यासारख्या जमिनी घेतल्यात.