मुंबई 23 जुलै : राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 22 दिवस उलटून गेले आहेत. या दोघांनीही 30 जूनला मंत्रिपदाची शपथ घेतली, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. अशात नेमका मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे. BREAKING : खरी शिवसेना कोणाची? आता निवडणूक आयोग करणार फैसला, दोन्ही गटांना महत्त्वाचे आदेश उदयनराजे भोसले म्हणाले, की ‘निश्चितपणे या तीन-चार दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल’. पुढे उदयनराजे म्हणाले, की आम्ही सगळेजण देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करतो, वाढदिवसादिवशी फडणवीस आम्हाला भेटले त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. त्यांना शुभेच्छा द्यायची आम्हाला संधी मिळाली. हे सरकार लवकरच कोसळणार असा दावा वारंवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून केला जात आहे. यावरही त्यांनी उत्तर दिलं. उदयनराजेंनी असा दावा केला की या सरकारला दृष्ट लागू नये म्हणून हे सरकार पडणार नाही, असं विरोधक म्हणतात. काही काळजी करू नका हे सरकार पडणार नाही. दरम्यान 23 जुलैला भाजपची प्रदेश कार्यकारिणी आहे, तर 24 जुलैला राज्यभर आदिवासी पाड्यांवर भाजपकडून जल्लोष करण्यात येणार आहे. 25 जुलैला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत, त्यामुळे शिंदे सरकारचा विस्तार 26-27 जुलैला होण्याची शक्यता असल्याचं समोर येत आहे. कोर्टाचे अनेकदा समन्स, नंतर थेट वॉरंट, अखेर जयंत पाटलांना चढावी लागली कोर्टाची पायरी राज्य सरकारचं अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा शिंदे सरकारचा विचार आहे, त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. दुसरीकडे राज्यात घडलेलं सत्तानाट्य आणि झालेला शपथविधी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात 1 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे.