JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव टेम्पोनं चिरडलं, पंढरपुरातील घटना

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव टेम्पोनं चिरडलं, पंढरपुरातील घटना

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव टेम्पोनं चिरडल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 6 डिसेंबर: कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव टेम्पोनं चिरडल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-हैदराबाद महामार्गावरील टेंभुर्णी गावाजवळील वरवडे टोल नाक्याजवळ रविवारी सायंकाळी घटना घडली. पोलीस कर्मचाऱ्यानं तपासणीसाठी टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता टेम्पो चालकानं थेट पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर टेम्पो घातला. यात पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. सागर औदुंबर चोबे असे मयत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सागर चोबे हे पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. हेही वाचा… शक्तीशाली स्फोटानं सांगली हादरलं, एक ठार दोन गंभीर; अनेक वाहनं जळून खाक मिळालेली माहिती अशी की, वरवडे ( ता.माढा) येथील टोल नाक्यावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोनं ठोकरलं. यात पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे टोल नाक्यावर टेंभुर्णीच्या दिशेने निघालेल्या टेम्पोला थांबवण्यासाठी ड्युटीवर असलेल्या पोलिस नाईक औदुंबर चोबे यांनी हात केला होता. यावेळी भरधाव टेम्पोने चोबेंना ठोकरलं व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सायंकाळी 6 वाजता घडली. हेही वाचा… पुण्यात बर्थडे पार्टीत तिघांनी केली ‘गंदी बात’, महिलेसमोरच विवस्त्र अवस्थेत केला टेम्पो क्रमांक ( MH 04 hd 0170) ह्या हैद्राबादहून आलेल्या टेम्पोचा चालक नवनाथ शिवाजी गुट्टे ( रा. परळी वैजनाथ, जि बीड) यास अटक करण्यात आली आहे. पोलिस नाईक औदुंबर चोबे पंढरपूरचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या