JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai news : ती लोकलची वाट पाहत मोबाईलमध्ये बिझी होती, तो आला आणि मोबाईल घेऊन पळाला, LIVE VIDEO

Mumbai news : ती लोकलची वाट पाहत मोबाईलमध्ये बिझी होती, तो आला आणि मोबाईल घेऊन पळाला, LIVE VIDEO

रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला. त्यानंतर आरोपी संजूकुमार प्रजापती याला सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वसईतील भोयदापाडा येथून अटक केली.

जाहिरात

(भाईंदर रेल्वे स्थानकावरील घटना)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय देसाई, प्रतिनिधी भाईंदर , 30 जून : मुंबईतील लोकल स्टेशन म्हणजे दुसरी गर्दीचे ठिकाण. त्यामुळे मोबाईल तर चोरीला जाणार नाही ना याची प्रत्येक जण काळजी घेत असतो. पण भाईंदर रेल्वे स्थानकावर मोबाईलमध्ये व्यस्त असलेली विद्यार्थिनीच्या मोबाईल चोराने हातातून हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. घडलेली हकीकत अशी की, भाईंदर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3/4 वर एक 18 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या कॉलेजला जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होती. तेव्हा काळी पॅन्ट, काळा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती ट्रेनमधून बाहेर आला आणि बसलेल्या विद्यार्थ्याचा मोबाईल फोन घेऊन पळून गेला या सर्व प्रकार रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

संबंधित बातम्या

अचानक मोबाईल घेऊन पळ काढल्यामुळे तरुणीने तिचा पाठलाग केला पण तोपर्यंत पळून गेला होता. विशेष म्हणजे, स्टेशनवर गर्दी असताना हा प्रकार घडला आहे. विद्यार्थिनीने वसई रोड लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन चोरीचा गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला. त्यानंतर आरोपी संजूकुमार प्रजापती याला सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वसईतील भोयदापाडा येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजू कुमार चोरीचा मोबाईल स्वत: वापरत होता. सध्या पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. तसंच चोरट्यालाही अटक करण्यात आली आहे. (सावधान! भाजी घेण्याआधी हा VIDEO जरूर पाहा; नवी मुंबई APMC मध्ये धक्कादायक प्रकार) दरम्यान, मालाड रेल्वे स्थानकावर मन सुन्न करणारी घटना घडली आहे.  मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर एक 17 वर्षीय तरुण जेवणाचा डबा धूत होता. त्यानंतर अचानक फास्ट लोकल ट्रेनने त्याला धडक दिली.  ही धडक इतकी जोरदार होती की, तरुण आणि त्याचा मित्र दूरपर्यंत फेकला गेला. जखमी तरुणाला जवळच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी 17 वर्षीय तरुणाला मृत घोषित केले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या