भाग्यश्री प्रधान - आचार्य, प्रतिनिधी ठाणे, 3 जून: अधिक गुण मिळालेल्या पालकांना आपल्या पाल्याचे कौतुक असतेच पण कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकही आपल्या आई वडिलांना असतं. आपला मुलगा पास झाला यातच ते समाधानी असतात. घरची परिस्थिती गरिबीची आई अपंग आणि बाबा रिक्षा चालक असणाऱ्या विशाल कराडने कमाल केली आहे. सर्वच विषयात त्याला 35 टक्के गुण मिळाले आहेत. पण त्याच्या या यशाचं आई वडिलांना मोठं कौतुक आहे. ठाण्यातील विशाल झााला काठावर पास विशाल हा ठाण्यातील शिवाई शाळेचा विद्यार्थी आहे. तो ठाण्यातील उथळसर येथील चाळीत राहतो. विशालची आई अपंग आहे. इतकेच नव्हे तर घराला हातभार लागावा यासाठी त्या दोन घरची धुणी भांडी देखील करतात. तर वडील रिक्षा चालवतात. मात्र विशालच्या या यशानंतर खूप आनंद झाला असल्याचे आई ज्योती कराड सांगतात.
मुलाच्या यशाचं कौतुक विशालनं सर्व विषयात 35 टक्के मिळवले आहेत. त्यानं कशातही करियर करावं. त्याच्यावर आमचा कोणताही दबाव नाही. तो पास झाला याच गोष्टीचं आम्हाला समाधान आहे. तसंच कुणीच मुलांवर दडपण आणू नये, असे विशालचे वडील अशोक कराड सांगतात. Wardha News: आजोबांनी दिला यशाचा मंत्र, फर्निचर बनवणाऱ्याची मुलगी जिल्ह्यात अव्वल, Video विशालला व्हायचंय कलेक्टर विशाल सर्व विषयांत 35 टक्के गुण घेऊन पास झाला आहे. आता भविष्यात शिक्षण सुरूच ठेवणार आहे. घरची परिस्थिती बेताची असली तरी उच्च शिक्षण घेऊन कलेक्टर व्हायचंय. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करायचंय, असं विशाल म्हणतोय.